आम्ही दिलेलं F-16 भारताविरोधात का वापरलं? अमेरिका पाकिस्तानची चौकशी करणार

वॉशिंग्टन : पाकिस्तानने एफ-16 हे विमान वापरत भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला खरा, पण ही चाल आता पाकिस्तानच्या अंगाशी येणार आहे. कारण, अमेरिकेसोबत पाकिस्तानचा एफ-16 बाबतचा जो करार आहे, त्याचं हे उल्लंघन मानण्यात आलंय. त्यामुळे पाकिस्तानकडून चौकशी सुरु झाली आहे. पाकिस्तानने एफ-16 चा वापर केल्याचा पुरावाच भारतीय वायूसेनेने सादर केला होता. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात […]

आम्ही दिलेलं F-16 भारताविरोधात का वापरलं? अमेरिका पाकिस्तानची चौकशी करणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

वॉशिंग्टन : पाकिस्तानने एफ-16 हे विमान वापरत भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला खरा, पण ही चाल आता पाकिस्तानच्या अंगाशी येणार आहे. कारण, अमेरिकेसोबत पाकिस्तानचा एफ-16 बाबतचा जो करार आहे, त्याचं हे उल्लंघन मानण्यात आलंय. त्यामुळे पाकिस्तानकडून चौकशी सुरु झाली आहे. पाकिस्तानने एफ-16 चा वापर केल्याचा पुरावाच भारतीय वायूसेनेने सादर केला होता.

पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात एफ-16 संबंधी एंड-युझर हा करार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याचे मते, अमेरिकेला या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती असून सध्या अधिक तपास केला जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्णल कोन फॉकनर यांच्या मते, शस्त्र विक्री करारातील गोपनियतेमुळे याबाबत चर्चा केली जाऊ शकत नाही. अमेरिका अत्याधुनिक शस्त्र विकणारा जगातला सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे या शस्त्रांच्या वापराबाबत विविध करार असून अमेरिकेची यावर निगराणी असते.

अमेरिकेची डिफेंस सिक्युरिटी आणि कॉर्पोरेशन एजन्सी म्हणजेच डीएससीएच्या मते, एफ 16 विमान दहशतवादविरोधी अभियानासाठी पाकिस्तानला दिलं होतं. सार्वजनिकरित्या जी माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार एफ-16 हे वापरण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर विविध 12 प्रकारच्या अटी ठेवलेल्या आहेत. पण पाकिस्तानने या सर्व अटी आणि नियमांना केराची टोपली देत अमेरिकेने दिलेल्या विमानाचा वापर थेट भारताविरोधातच केला. नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अमेरिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय.

एफ-16 या विमानाचा वापर आम्ही केलाच नाही, असा दावा पाकिस्तानने केला होता. पण भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या या खोटेपणाचा बुरखा फाडत थेट पुरावाच सादर केला. भारताच्या मिग 21 ने एफ-16 हे अत्याधुनिक विमान पाडलं होतं. त्याचे पार्ट भारतीय वायूसेनेने दाखवले. त्यामुळे या प्रकरणाची आता अमेरिकेनेही दखल घेतली आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला एफ-16 का दिलं?

अमेरिकेने 80 च्या दशकात एफ-16 हे लढाऊ विमान पाकिस्तानला दिलं होतं. पाकिस्तानने दहशतवादविरोधी कारवायांसाठी याचा वापर करावा, असा यामागचे हेतू होता. अटींनुसार, अमेरिकेच्या परवानगीनुसार पाकिस्तानला या विमानाचा वापर सैन्य कारवाईसाठी करता येत नाही. कारण, स्वतःच्या संरक्षणासाठी हे विमान देण्यात आलंय. त्यामुळे सैन्यावर हल्ला करण्यासाठी याचा वापर करता येणार नाही. पाकिस्तानने भारतीय वायूसेनेवर या विमानाने हल्ला केला.

एफ-16 हे अमेरिकेत तयार झालेलं लढाऊ विमान असून यामध्ये वापरण्यात येणारे एमरॉम मिसाईलही अमेरिकेतच तयार होतात. या विमानाच्या वापरासाठी अमेरिकेच्या काही अटी असतात. नियमानुसार, या विमानाचा वापर दुसऱ्या देशाविरुद्ध करायचा असेल तर अमेरिकेची परवानगी आवश्यक आहे. नियमांचं उल्लंघन झाल्यास अमेरिकेकडून कारवाई केली जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.