AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला धक्का देत चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत

Lok Sabha Election 2024 News in Marathi: मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. यामुळे भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला. मात्र कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजना आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

भाजपला धक्का देत चार नगरसेवक काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासोबत
bjpImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 26, 2024 | 10:31 AM
Share

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होत आहे. निवडणूक प्रचार जोरात सुरु असताना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात अनेक कार्यकर्ते अन् पदाधिकारी जात आहे. प्रत्येक पक्षाला या आयाराम-गयारामचा फटका बसत आहे. आता सांगलीमध्ये भाजपला धक्का बसला आहे. सांगली लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे. पक्षाचा राजीनामा देऊन या नगरसेवकांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडून भाजपविरोधात उघड प्रचार होत होता.

भाजपकडून होणार होती कारवाई

मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. यामुळे भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला. मात्र कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजना आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांना भाजपमधील आणखी तीन नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांच्या बद्दलची पक्षातील नाराजी उघडपणे आता समोर आली आहे.

विशाल पाटील काय म्हणतात

माझी उमेदवारी कोणत्याही स्वार्थासाठी नाही. मी केलेले बंड हे स्वतःसाठी केलं नाही, पक्षासाठी केले आहे. पक्षाचे विचार जिवंत राहिले पाहिजे, आपला उद्देश असल्याचे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासाठी योगदान पाहता काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करेल असे मला वाटत नाही. मला कोणत्याही पद्धतीची लेखी सूचना अद्यापही आलेली नाही. इतर पक्षाचे लोक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांना माझा एवढा सल्ला आहे, आपण आपापले घर बघा काँग्रेस पक्ष कसा चालवायचा हे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच माहीत आहे.

वसंतदादा पाटील यांनी माणसं कमावले माणसंही त्यांची संपत्ती होती. वसंत दादांची हीच संपत्ती माझी आहे, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. निकालानंतर समजेल कोण भाजपच्या बाजूने लढत होते. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की सर्वजण माझ्याच विरोधात बोलतात. पण जनतेने ठरवले आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांना विशाल पाटील यांनी लगावला आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा