Russia Ukraine War : तर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असेल, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं मोठं वक्तव्य, इंच इंच भूमी लढण्याचीही घोषणा

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आम्ही नाटोचे सदस्य असलेल्या प्रत्येक देशाचे रक्षण करण्यास बांधिल आहोत. आम्ही नाटो देशांचे संरक्षण करू, मात्र या युद्धात आम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Russia Ukraine War : तर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असेल, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं मोठं वक्तव्य, इंच इंच भूमी लढण्याचीही घोषणा
जो बायडन
Image Credit source: ANI
| Updated on: Mar 12, 2022 | 7:02 AM

रशिया (Russia) आणि युक्रेनचे (Ukraine) युद्ध सुरूच आहे. युद्ध सुरू होऊन 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेन मदतीसाठी नाटोचे सदस्य असलेल्या देशांकडे मोठ्या आशेने पाहात आहे. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Biden) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आम्ही नाटोचे सदस्य असलेल्या प्रत्येक देशाचे रक्षण करण्यास बांधिल आहोत. आम्ही नाटो देशांचे संरक्षण करू, मात्र या युद्धात आम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. नाटोचे सदस्य असलेल्या देशांनी जर या युद्धात सहभाग घेतला तर तिसरे महायुद्ध अटळ आहे. ज्यामुळे जगाचे प्रचंड नुकसान होऊ शकते. आपल्याला तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करयाचे आहेत. त्यामुळे अमेरिका युद्धात सहभागी होणार नसल्याचे बायडन यांनी म्हटले आहे.

रशियाची आर्थिक कोंडी

दरम्यान यापूर्वी देखील बायडन यांनी आम्ही युक्रेनला सर्व प्रकारची मदत करू, मात्र आमचे सैन्य प्रत्यक्ष युक्रेनमध्ये जाऊन रशियाविरोधात युद्ध करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी सर्वच बाजुने रशियाची आर्थिक कोंडी केली आहे. रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेने तर रशियामधून होणाऱ्या कच्च्या तेलाची तसेच इतर ऊर्ज साधनाची आयात देखील थांबवली आहे. याचा परिणाम म्हणजे रशियन चलनाच्या मुल्यात घट झाली आहे. मात्र दुसरीकडे याचा मोठा फटका हा जागतिक बाजारपेठेला देखील बसल्याचे पहायला मिळत आहे.

कॅनडाचा युक्रेनला पाठिंबा

आता कॅनडाने देखील युक्रेनला पाठिंबा दिला आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  युद्धाच्या भीतीपोटी अनेक नागरिक स्थलांतर करत असून, ते शेजारील देश पोलंडच्या आश्रयाला जात आहेत. युक्रेनमधून स्थलांतरील लोकांना कॅनडामध्ये आश्रय देऊ असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले आहे. तसेच रशियावर घालण्यात आलेल्या आर्थिक निर्बंंधांमुळे रशियाची आर्थिक कोंडी होईल अशी अशा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या

त्या मिसाईलनं तर दोन्ही देशांच्या लोकांचा जीव धोक्यात आणला, अपघातानं पाकिस्तानवर फायर झालेल्या मिसाईलवर पाकची पहिली प्रतिक्रिय

Russia Ukraine War : मेटरनिटी रुग्णालयावर रशियाचा तुफान गोळीबार, रुग्णालयाची ही अवस्था बघून काळजाचा थरकाप उडेल

रशियाचा निषेध न केल्याने बांग्लादेश फटका, लिथुआनियाकडून कोविड लसीची डिलिव्हरी रद्द