Vaccine is Word of the Year: ‘व्हॅक्सिन’ वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषीत, काय आहेत कारणं?

| Updated on: Dec 01, 2021 | 7:31 AM

या शब्दाने गेल्या दोन वर्षांत अनेक विक्रम केले आहेत. पीटर सोकोलोव्स्की म्हणतात, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये 601 टक्क्यांनी जास्त 'व्हॅक्सिन' शब्द सर्च करण्यात आला.

1 / 6
अमेरिकन डिक्शनरी मेरियम-वेबस्टर (Merriam-Webstar) ने 'व्हॅक्सिन' (Vaccine) ला 'वर्ड ऑफ द इयर' 2021 म्हणून घोषित केले आहे. व्हॅक्सिन म्हणजे काय हे लहानपणापासूनच आपल्या सर्वांना माहीत आहे, पण गेल्या दोन वर्षांत जगाभरात हा शब्द जास्तीत जास्त वेळा वापरला गेला आहे.

2 / 6
Corona Vaccination

Corona Vaccination

3 / 6
मेरियम-वेबस्टर डिक्शनरीचे संपादक पीटर सोकोलोव्स्की यांच्या मते,  'व्हॅक्सिन' वर्षाचा शब्द म्हणून निवडण्याची दोन कारणे आहेत. पहिलं म्हणजे जगभरातील लोकांना लसीचे महत्त्व समजले आणि दुसरे कारण म्हणजे लसीकरणाबाबतचा वाद. महत्त्वाच्या बाबींवर याचा शोध, यावरची चर्चा वाढत गेली.

4 / 6
या शब्दाने गेल्या दोन वर्षांत अनेक विक्रम केले आहेत. पीटर सोकोलोव्स्की म्हणतात, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये 601 टक्क्यांनी जास्त 'व्हॅक्सिन' शब्द सर्च करण्यात आला. 2021 मध्ये दररोज त्यांचा डेटाबेसमध्ये 'व्हॅक्सिन' हा शब्द वारंवार येत राहिला. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिल्या डोसपासून या शब्दाची चर्चा वाढत गेली. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये 1,048 टक्क्यांनी जास्त हा शब्द सर्च केला गेला.

5 / 6
 अनेक मुद्द्यांवरून 'व्हॅक्सिन' शब्दाचा सर्च वाढला. पीटर सोकोलोव्स्कीच्या म्हणण्यानुसार, जगात लसीशी संबंधित अशा समस्या देखील आहेत, ज्यामुळे वर्षभर त्याची चर्चा झाली. उदाहरणार्थ, लसीचा अभाव, लसीचे चुकीचे वितरण, लस प्रमाणपत्र, लसीचा राष्ट्रवाद आणि बूस्टर डोस. लसीशी संबंधित अशा मुद्द्यांवर सतत व्हॅक्सिनवर चर्चा झाली आणि सर्चींग वाढत गेले.

6 / 6
 व्हॅक्सिन हा शब्द कोठून आला? तर, मेरियम-वेबस्टर शब्दकोष म्हणते की व्हॅक्सिन हा शब्द प्रथम 1882 मध्ये वापरला गेला होता. हा शब्द लॅटिन भाषेतील 'व्हॅक्सिनस' (Vaccinus) या स्त्रीलिंगी शब्दापासून आला आहे. या शब्दाचा अर्थ 'गाईपासून निर्माण झालेला' असा होतो.