व्हेनेझुएलाने छापली थेट 10 लाखाची नोट, भारतात एवढ्यात अर्धा लीटर पेट्रोलही मिळणार नाही!

| Updated on: Mar 06, 2021 | 8:58 PM

व्हेनेझुएलात सध्या महागाईनं उच्चांक गाठला आहे. अशास्थितीत 10 लाख रुपयांच्या नोटाची किंमत अर्धा अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 36 रुपये आहे.

व्हेनेझुएलाने छापली थेट 10 लाखाची नोट, भारतात एवढ्यात अर्धा लीटर पेट्रोलही मिळणार नाही!
Follow us on

नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशानं आर्थिक मंदी आणि महागाईतून बाहेर पडण्यासाठी 10 लाख रुपयांची नोट छापली आहे. यापूर्वी जगातील कुठल्याही देशानं एवढ्या मोठ्या किंमतीची नोट छापलेली नाही. दरम्यान, व्हेनेझुएलात सध्या महागाईनं उच्चांक गाठला आहे. अशास्थितीत 10 लाख रुपयांच्या नोटाची किंमत अर्धा अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 36 रुपये आहे. या किंमतीत भारतात अर्धा लीटर पेट्रोलही मिळणार नाही.(Venezuela prints Rs 10 lakh note to stave off recession and inflation)

कझी तेलाच्या बळावर संपन्नता भोगलेल्या देशात आला लोक उपाशी मरत आहेत. रुपयांच्या अवमुल्यनाचा परिणाम हा की लोक सामान खरेदी करण्यासाठी पोते भरुन पैसे घेऊन जातात आणि एखाज्या पॉलिथीनच्या पिशवीत सामान घेऊन येतात. व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेनं सांगितलं की, देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती पाहिल्यावर मोठ्या किंमतीच्या नोटा छापाव्या लागल्या. पुढील आठवड्यात 2 लाख बोलिवर आणि 5 लाख बोलिवरच्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. वर्तमानात व्हेनेझुएलामध्ये 10 हजार, 20 हजार आणि 50 हजार बोलिवरच्या नोटा चलनात आणल्या आहेत. भारतातील 1 रुपयाची व्हेनेझुएलातील किंमत 25 हजार 584.66 बोलिवर आहे.

गेल्या वर्षीपासून नोट छपाईची तयारी

गेल्यावर्षीच्या ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार व्हेनेझुएला सरकार लवकरच 10 लाखाची नोट छापणार असल्याचं सांगितलं होतं. यासाठी इटलीतील एका फर्मकडून 71 टन सेक्युरिटी पेपरची आयात केली होती. या फर्मची मालकी इटलीच्या बॅन कॅपिटलकडे आहे. जी जगभरात अनेक देशांना सेक्युरिटी पेपरची निर्यात करते.

10 लाख रुपयांत फक्त अर्धा किलो तांदुळ

व्हेनेझुएलात 10 लाख बोलिवरची नोट आता सर्वाधिक मूल्याची नोट बनली आहे. मात्र, या नोटाची किंमत अर्धा यूएस डॉलर आहे. विशेष बाब म्हणजे एवढ्या रुपयांत फक्त 2 किलो बटाटे किंवा अर्धा किलो तांदूळ मिळू शकतो. तिथल्या सरकारने लोकांना सवलत देण्यासाठी मोठ्या मूल्याच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक लोक सुट्टे पैसे घेऊन जाण्यापासून वाचू शकतात.

इतर बातम्या :

100 वर्षे जुन्या CBSE बोर्डाविरोधात नवा शैक्षणिक बोर्ड उभा करु शकतील केजरीवाल? दिल्ली सरकारची मोठी घोषणा 

ती चौघांसोबत पळाली पण कुणाशी गाठ बांधावी? गावानं चिठ्ठ्या टाकल्या, पुढे जे झालं त्याची देशभरात चर्चा

Venezuela prints Rs 10 lakh note to stave off recession and inflation