मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा डळमळीत, यंदा अर्थसंकल्पात खर्चाच्या तरतुदी कमी

आर्थिक मंदी, कोट्यवधीचा थकलेला मालमत्ता कर, बांधकाम क्षेत्रातील घटलेल्या उत्पन्नामुळे मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा डळमळीत (Mumbai BMC budget) झाला आहे.

मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा डळमळीत, यंदा अर्थसंकल्पात खर्चाच्या तरतुदी कमी
Follow us
| Updated on: Feb 02, 2020 | 11:59 PM

मुंबई : आर्थिक मंदी, कोट्यवधीचा थकलेला मालमत्ता कर, बांधकाम क्षेत्रातील घटलेल्या उत्पन्नामुळे मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा डळमळीत (Mumbai BMC budget) झाला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठेवी मोडून तरतूदी करण्यात आल्या होत्या. यंदाही आर्थिक मंदीचे सावट असल्याने 2020-21 च्या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य वगळता बहुतांश विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

येत्या मंगळवारी, 4 फेब्रुवारीला स्थायी समिती यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प 30 हजार 692 कोटींवरून 27 हजार कोटींपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

2019-20 या वर्षाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प अंदाजे 30 हजार 692 कोटी 59 लाख इतका होता. यंदाच्या डिसेंबरपर्यंत फक्त १२ हजार कोटी खर्च झाले आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे 2020-21 च्या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य वगळता बहुतांश कामांवरील खर्चाच्या तरतुदी कमी केल्या जाण्याची शक्यता आहे.

आधीच विविध कामे, कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळेही आर्थिक बोजा वाढला आहे. त्यात कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसह विविध पायभूत प्रकल्पांना यापूर्वीच फटका बसला आहे. पालिकेचे उत्पन्न घटल्याने खर्चाचे प्रमाण खाली आले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे मागील वर्षभरात पाच ते सात टक्क्यांपेक्षा पुढे सरकू शकलेली (Mumbai BMC budget) नाहीत.

अर्थसंकल्पाचे आकारमान कमी असल्याची शक्यता

कोस्टल रोड, प्रस्तावित पाणी प्रकल्प, रस्ते आणि पूल आदी कामांवर विशेष भरीव तरतूद केली होती. मात्र खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी ठेवी मोडाव्या लागल्या होत्या. यंदाच्याही अर्थसंकल्पाचे आकारमान कमी करुन खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

त्यातच मालमत्ता कर थकल्यानं पालिकेला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. एकूण उद्दिष्टाच्या 50 टक्के मालमत्ता कराची रक्कमही यंदा तिजोरीत नाही. त्यात 2018-19 या वर्षात कराच्या वसूलीतून 5044 कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे.

मागील वर्षांच्या उत्पन्नात 10 टक्क्यांनी वाढ करून आगामी वर्षांचे मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्टय़ निश्चित केले जाते. त्याप्रमाणे 2019-20 या वर्षांत 5844.94 कोटी रुपये मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य ठेवलं आहे.

मात्र, जानेवारी 2020 पर्यंत पालिकेला मालमत्ता करापोटी 2394.38 कोटी रुपयेच वसूल करता आले. त्यामुळे एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत 50 टक्के रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर आगामी अर्थसंकल्पातील रकमांना कात्री लागण्याची शक्यता व्यक्त होत (Mumbai BMC budget) आहे.

गेल्या काही वर्षातील अर्थसंकल्प

2015-16 चा अर्थसंकल्प 26,479.15 कोटी इतका होता. तर 2016-17वर्षांच्या अर्थसंकल्पाने 37,052.15 कोटी रुपयांवर उसळी घेतली होती.

प्रस्तावित तरतुदी आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे आढळून आले होते. अर्थसंकल्प आकडेवारीद्वारे फुगविण्यात आल्याची टीका त्यावेळी झाली होती. परिणामी, 2017-18 च्या अर्थसंकल्पात 12 हजार कोटींनी घट झाली होती.

चालू आर्थिक वर्षांसाठी 30,692.59 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता करासोबतच अन्य उत्पन्नांमध्येही घट झाली आहे. यामुळे 2020-21 च्या अर्थसंकल्पावर परिणाम होण्याची चिन्हे (Mumbai BMC budget) आहेत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.