जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चीनच्या अध्यक्षांचे धक्कादायक विधान, थेट म्हटले, संपूर्ण जग..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर आहेत. तीन दिवसीय हा दाैरा आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह चीनच्या अध्यक्षांनी जगाची झोप उडवणारी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर आहेत. शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्याकरिता ते बीजिंगमध्ये दाखल झाले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बीजिंगमध्ये त्यांचे स्वागत केले. अमेरिका आणि चीन यांच्यात संबंध खास नाहीत. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने काही आरोप चीनवर केले. चीन इराणला मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. यासोबतच होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेने चीनला मदत मागितली. मात्र, चीनने अमेरिकेला कोणताही प्रतिसाद दिला नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात नुकताच बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही नेते एकमेकांचे काैतुक करताना दिसले. शी जिनपिंग यांनी थेट म्हटले की, आपण प्रतिस्पर्धी नाहीत आपण खरे मित्र आहोत. दोन्ही देशातील मजबूत संबंध दोघांकरिताही फायदेशीर असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. एकत्र मिळून आपण जग बदलू असेही म्हटले. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली.
यादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, शी जिनपिंग आणि माझ्यात चांगली मैत्री आहे. ते माझे मित्र आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध चांगले आहेत. विशेष म्हणजे भविष्यातही हे संबंध अधिक चांगले होतील. मुळात म्हणजे आमच्यात मतभेदांपेक्षा अधिक समान हितसंबंध आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या चीन दाैऱ्याकडे जगाच्या नजरा आहेत.
डोनाल्ड ट्रम्प 2017 मध्ये चीन दाैऱ्यावर गेले होते, त्यानंतर थेट 2026 मध्ये ते पुन्हा चीन दाैऱ्यावर आहेत. अनेक महत्वाचे व्यापार करारा यादरम्यान होण्याची शक्यता आहे. दोन्ही देश व्यापाऱ्यांबद्दल मोठे निर्णय घेऊ शकतात. चीन दाैऱ्यावर जाण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराण युद्धाबाबत चीनच्या दाैऱ्यादरम्यान चर्चा होईल. मात्र, बैठकीचा मुद्दा इराणचे युद्ध नसणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दाैरा पूर्वनियोजित होता. यासोबतच मध्ये चीनसोबत ताणलेल्या संबंधात डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन दाैरा रद्द करण्याचेही संकेत दिले होते. इराणच्या युद्धात मध्यस्थी करण्याकरिता चीनची मदत घेणार नसल्याचेही अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आले. आता दोन्ही देश नक्की काय घोषणा करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अमेरिकेच्या दबावानंतर चीनने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे.