
अमेरिकेने रशियाच्या तेल कंपन्यांवर नवीन प्रतिबंध लादल्यानंतर व्लादीमीर पुतिन खवळले आहेत. अमेरिका युक्रेनेला टॉमहॉक मिसाइल देण्याबद्दल बोलत आहे. या टॉमहॉक मिसाइलमुळे युक्रेनला रशियाच्या आत खोलवर हल्ले करता येतील. या टॉमहॉक मिसाइलवरुन पुतिन यांनी स्पष्ट शब्दात सांगितलय की, रशियाची प्रतिक्रिया ही चिरडून टाकणारी आणि आश्चर्यकारक असेल. जेलेंस्की हे रशियाच्या आत खोलवर हल्ले करणार मिसाइल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेते. त्यावर पत्रकारांनी विचारलं असता पुतिन यांनी हे उत्तर दिलं. ट्रम्प आणि पुतिन यांचं बुडापेस्ट शिखर सम्मेलन रद्द झालय आणि अमेरिकेने रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर पुतिन बोलत होते. नवीन प्रतिबंध हे रशियावर दबाव टाकण्याचा आणखी एक प्रयत्न आहे असं पुतिन म्हणाले.
रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेच्या नव्या प्रतिबंधांना रशिया विरुद्ध युद्धाची कारवाई Act of War म्हटलं आहे. मेदवेदेव हे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं प्रस्तावित बुडापेस्ट शिखर सम्मेलन रद्द झालं आहे. बुधवारी ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यानंतर अमेरिकेने रशियाच्या दोन तेल कंपन्या रुक ऑयल आणि रोजनेफ्टवर प्रतिबंध लावले. या दोन कंपन्यांमधून रशियाचं 50 टक्के तेल निघतं. युक्रेन बऱ्याच काळापासून अमेरिकेकडे लांब पल्ल्याच्या टॉमहॉक क्रूज मिसाइलची मागणी करत आहे.
बैठक रद्द होण्यावर पुतिन काय म्हणाले?
कुठलाही स्वाभिमानी देश बाहेरच्या दबावासमोर झुकत नाही. खासकरुन रशिया असं पुतिन म्हणाले. रशियावर बहुतांश अमेरिकी प्रतिबंध ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लावण्यात आले होते याची आठवण पुतिन यांनी करुन दिली. बुडापेस्टची बैठक रद्द केलेली नाही, स्थगिती केली आहे असं पुतिन म्हणाले. टॉमहॉक मिसाइलची रेंज 1600 किलोमीटर आहे. अमेरिकी नौदलाकडून या मिसाइलचा वापर केला जातो. अमेरिकेने टॉमहॉक मिसाइल दिले तर रशियाकडून यापेक्षाही भयानक हल्ले युक्रेनवर होऊ शकतात.