
बांगलादेशमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यापासून भारत आणि बांगलादेशातील संबंध तणावात आहेत. हेच नाही तर बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड प्रमाणात अत्याचार वाढले आहेत, याबाबतचे काही धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बांगलादेशात कहर सध्या बघायला मिळतोय. हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेशात हिंसाचार वाढला आहे आणि हिंसक आंदोलने सुरू आहेत. हेच नाही तर भारतीय व्हिसा कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. याच पार्श्वभूमीनंतर भारताने मोठा निर्णय घेत बांगलादेशातील खुलना, राजशाही, चितगाव येथील व्हिसा सेवा निलंबित केल्या. भारताने घेतलेल्या निर्णयानंतर बांगलादेशानेही थेट भारतातील व्हिसा सेवा पूर्णपणे बंद केली. आता दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत.
बांगलादेशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा सोमवारी अॅक्शन मोडमध्ये दिसले. भारतीय दूतावासांविरुद्ध दिल्या जाणाऱ्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून ते थेट ढाका येथील जमुना फ्युचर पार्कमधील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रात गेले आणि तेथे उपस्थित असलेल्या सामान्य बांगलादेशी नागरिकांना भेटले. भारतीय दूतावाला धमक्या सध्या दिल्या जात आहेत. भारताच्या सरकारचे बांगलादेशातील घडामोडींवर बारीक लक्ष आहे.
हेच नाही तर सीमेवरही सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याची माहिती आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. सर्व अडचणी असूनही भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा भारत मानवतावादी दृष्टिकोनातून व्हिसा सेवा सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहे, हा संदेश देण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यांनी यादरम्यान थेट लोकांसोबत संवाद देखील साधला.
प्रणय वर्मा यांच्या भेटीदरम्यान, व्हिसा प्रक्रियेतील तांत्रिक आणि बाह्य अडथळ्यांबाबतही चर्चा झाली. ढाकामध्ये परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चितगावमधील परिस्थिती चिंताजनक आहे. 19 डिसेंबरच्या रात्री जमावाने चितगावमधील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांवर (एएचसीआय) हल्ला केला. ज्यामुळे हे व्हिसा केंद्र तात्काळ बंद करण्यात आले. सुरक्षा कारणामुळे हे व्हिसा केंद्र बंद करण्यात आले. बांगलादेश सध्या पाकिस्तानचा जवळचा मित्र बनला असून तिथे मोठी हिंसा सुरू आहे. यादरम्यान भारतीय लष्कर अलर्ट मोडवर आहे.