
मागच्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीय. आता बातमी अशी आहे की, रशियन सैन्य संपूर्ण फ्रंटलाइनवर पुढे जातय. आमचं सैन्य सर्वबाजूंनी पुढे सरकतय. त्यांनी अनेक फायद्याच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत असं रशियाने रविवारी सांगितलं. सूमी भागात अनेक ठिकाणी सैन्य मागे हटलं आहे, अशी दुसऱ्याबाजूला युक्रेनकडून पुष्टि करण्यात आली. “मागच्या 24 तासात रशियन सैन्याने युक्रेनच्या मिलिट्री-इंडस्ट्रियल एंटरप्राइजेज, एनर्जी, ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज इंफ्रास्ट्रक्चरवर हल्ला केला आहे. त्यांच्याकडून युक्रेनी मिलिट्री युनिट्सला सपोर्ट मिळत होता” असं रशियन संरक्षण मंत्रालयाने आपल्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मंत्रालयानुसार, “युक्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या ड्रोन निर्मिती करणाऱ्या साइट्स, युक्रेनी सशस्त्र पथकं आणि परदेशी भाड्याच्या सैनिक तळांना लक्ष्य करण्यात आलं” “रशियन सैन्य वेगाने पुढे येत असल्याने युक्रेनी सैन्य सूमी क्षेत्राच्या एका गावाच्या भागातून मागे हटलं” असं रविवारी युक्रेनी सशस्त्र पथकाच्या जनरल स्टाफने सांगितलं.
युक्रेनी सैनिकांचं सीमावर्ती भागात ऑपरेशन सुरु होतं. त्यामुळे रशियन सैनिकांचं नुकसान होत होतं. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांच्या दाव्यानुसार, मागच्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर जवळपास 1300 ड्रोन्स, 1200 गाइडेड एरियल बॉम्ब आणि विभिन्न प्रकारच्या 9 मिसाइल्स डागल्या. रशियाच्या या हल्ल्यात ओडेसा भागात आणि दक्षिणेकडेच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
बंदर इंफ्रास्ट्रक्चरवर मिसाइल हल्ला
जेलेंस्की यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. यूक्रेनी सैन्य प्रभावित भागात जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं. रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी रात्री ओडेसा भागात रशियन हल्ल्यात आठ लोकांचा मृत्यू झाला. 27 लोक जखमी झाले आहेत. युक्रेनच्या स्टेट इमरर्जन्सी सर्विसनुसार, रशियाच्या पिवडेन्ने शहरातील बंदर इंफ्रास्ट्रक्चरवर मिसाइल हल्ला करण्यात आला. सीएनएन रिपोर्टनुसार, मागच्या 9 दिवसात ओडेसामध्ये सतत हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यांमुळे शहर आणि आसपासच्या भागातील बत्ती गुल झाली आहे.