Rare Earth Minerals : चीनने ज्या खनिजावरुन अमेरिकेसह जगाला वेठीला धरलं ते रेअर अर्थ मिनरल्स भारतात कुठे मिळतं?

What are Critical Minerals : पुढच्या काळात रेअर अर्थ मिनरल्स खूप महत्त्वाच वाढणार आहे. सध्या चीनकडे या खनिजाच नियंत्रण आहे. त्यामुळे ते जगाला वेठीस धरु शकतात. या खनिजात एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याची ताकद आहे. भारताने हे खनिज कुठे सापडतं? जाणून घ्या.

Rare Earth Minerals : चीनने ज्या खनिजावरुन अमेरिकेसह जगाला वेठीला धरलं ते  रेअर अर्थ मिनरल्स भारतात कुठे मिळतं?
What are Critical Minerals
| Updated on: Oct 11, 2025 | 3:02 PM

चीनने येत्या 1 डिसेंबरपासून रेअर अर्थ मिनरल्‍सवर कठोर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. चीनकडून अमेरिकेसह जगातील अनेक देशांना रेअर अर्थ मिनरल्स या खनिजाचा पुरवठा केला जातो. चीनच्या या निर्णयामुळेच अमेरिकेने तडकाफडकी चीनमधून आयात होणाऱ्या सामानावर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. आजच्या तारखेला चीन रेअर अर्थ मिनिरल्सचा राजा आहे. रेअर अर्थ मिनरल्‍स निर्यातीचा 90 टक्के कंट्रोल चीनच्या हातात आहे. म्हणूनच चीन रेअर अर्थ मिनरल्‍सवरुन नवनवीन नियम आणत असतो. आता चीनने म्हटलय की, या खनिजाच्या निर्यातीवर ते कठोर नियंत्रण आणणार. पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबुतीच कारण चीनने यासाठी दिलय.

चीन ज्या रेअर अर्थ मिनरल्सवरुन जगाला वेठीस धरतोय ते भारतात कुठे मिळतात? या बद्दल जाणून घेऊया. भारत आपल्या गरजेच्या Rare Earth Elements चा 60 टक्के भाग चीनमधून आयात करतो. वर्ष 2022 मध्ये क्रिटिकल मिनरल्ससाठी भारताने ऑस्ट्रेलियासोबत सहकार्य करार केला. देशातंर्गत खाणकामाच्या माध्यमातून या मिनरल्सच उत्पादन वाढलं, तर भारत सेमीकंडक्टर, डिफेंस आणि एअरोस्पेस सारख्या सेक्टर्समध्ये उत्पादन क्षमता वाढवू शकतो. भारतात क्रिटिकल मिनरल्सच उत्पादन अनेक भागात होतं. जम्मू-कश्मीरचा रियासी भागात लिथियम, मध्य प्रदेशच्या सिंगरौली क्षेत्रात कोळसा खाणीत, ओदिशा आणि केरळात रेअर अर्थ एलिमेंट्स, गोव्यात बॉक्साइट, गोव्यातच मँगनीज, झारखंडमध्ये यूरेनियम आणि राजस्थानात थोरियम आणि पायराइट्स मिळतात. तामिळनाडू, राजस्थान, झारखंड, ओदिशा आणि कर्नाटकमध्ये टंगस्टन आणि क्रोमाइटच उत्पादन होतं.

रेअर अर्थ मिनरल्‍समुळे कुठले उद्योग प्रभावित होऊ शकतात?

कुठल्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकासासाठी या मिनरल्सचा सुरक्षित आणि नियमित पुरवठा सुनिश्चित करणं आवश्यक आहे. या मिनरल्सचा अनेक हायटेक प्रोडक्टसमध्ये वापर होतो. उदहारणार्थ स्मार्टफोन, कंप्यूटर आणि रीन्यूएबल टेक्नोलॉजी जसे की, सोलर पॅनल, पवन टरबाइन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये आवश्यक असतात. जग जसं-जसं शुध्द क्लीन एनर्जीच्या दिशेने वाटचाल करतय, तसं ईवी बॅटरी, सोलर पॅनल आणि ऊर्जा क्षेत्रासाठी लिथियम, कोबाल्ट, निकल सारख्या मिनरल्स खनिजांची मागणी वाढली आहे. कोळसा आणि पेट्रोल हे ऊर्जेचे पारंपारिक स्त्रोत आहेत. रेअर अर्थ मिनरल्सचा क्लीन एनर्जीमध्ये वापर होतो. अनेक क्रिटिकल मिनरल्सचा डिफेंस टेक्नोलॉजी रडार सिस्टम, मिसाइल आणि उपग्रहांमध्ये वापर होतो.