
पासपोर्ट काढणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही. सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर कुठे हे महत्त्वाचं कागदपत्रं हाती पडतं. शिक्षण, व्यवसाय आणि विदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचा दस्तऐवज आहे. भारतात चार प्रकारचे पासपोर्ट मिळतात. सामान्य नागरिकांसाठीचा पासपोर्ट, कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यासाठी अधिकृत पासपोर्ट, उच्च पदस्थांसाठी डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि विदेशात संकटात असलेल्यांसाठी आपत्कालीन पासपोर्ट जारी केला जातो. 18 वर्षांवरील नागरिकांसाठी पासपोर्टची वैधता ही 10 वर्षे, तर त्या खालील वय असलेल्यांसाठी पासपोर्ट वैधता ही 5 वर्षे असते. त्यामुळे पासपोर्ट काढणं आणि तो जपणं किती महत्त्वाचं आहे हे दिसून येतं. हा पासपोर्ट रद्द झाला तर काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना प्रकरणानंतर समजून घेता येईल. चला तर या बाबत सविस्तर जाणून घेऊयात बांगलादेशमध्ये सध्या अस्थितरतेचं वातावरण असून राजकीय उलथापालथ झाली आहे. पंतप्रधानांवर देश सोडून जाण्याची वाईट वेळ आली. राजकीय स्थिती...