
देशाची आर्थिक स्थिती आयत निर्यातीवर अवलंबून असते. पण अमेरिकेने गेल्या काही महिन्यात टॅरिफ वॉरचा धडाका लावला आहे. अमेरिकेने अनेक देशांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारतालाही या टॅरिफ वॉरचा फटका बसला आहे. कारण अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर थेट परिणाम होईल. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी अमेरिकेत घटेल असा अंदाज आहे. भारत रशियाकडून तेल आयात करतो म्हणून हा टॅरिफ लादला आहे, असं ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या भेटीकडे लक्ष लागून होते. ही बैठक अलास्का येथे पार पडली. पण या बैठकीतून ठोसं असं काही निघालं नाही. त्यामुळे भारताला टॅरिफचा फटका सहन करावा लागणार आहे. कदाचित टॅरिफ आणखी वाढवलं जाऊ शकतं. कारण रशियावर दबाव वाढवण्यासाठी भारताची कोंडी केली जाणार, असं ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. असं असताना भारताचे 100 रुपये अमेरिका आणि रशियात किती होतात? ते जाणून घेऊयात…
रशियाच्या चलनाला रशियन रूबल म्हंटलं जातं. तसं की आपल्या चलनाला रुपया म्हंटलं गेलं आहे. रशियन चलनासाठी रुबलचा शॉर्टफॉर्म हा RUB असा आहे. सांकेतिक स्वरुपात ₽ असं लिहिलेलं असतं. तर भारतीय चलनावर INR असं लिहिलेलं असतं. सांकेतिक चिन्ह म्हणून ₹ असं लिहिलेलं असतं. भारताचा एक रुपया रशियन 0.91 रशियन रुबल आहे. म्हणजेच भारताचे 100 रुपये रशियात 91.20 रशियन रुबल होतात. यामुळे या दोन्ही देशातील चलनात 8.80 रुपयांचा फरक आहे. हा फरक स्थिती वाढत किंवा कमी होत असतो.
अमेरिकेचा डॉलर हा जगातील श्रीमंत चलनापैकी एक आहे. अमेरिकेने 2 एप्रिल 1792 मध्ये डॉलरला चलन म्हणून मान्यता दिली. यापूर्वी अमेरिकेत देवाणघेवाणीसाठी सोनं किंवा चांदीचा वापर केला जात होता. पण अमेरिका जागतिक महासत्ता असून तिथल्या चलनाच्या किमतीकडे कायम लक्ष असते. आता भारताचे 100 रुपये अमेरिकेत किती होतात याबाबत जाणून घेऊयात. भारताचे 100 रुपये अमेरिकेतली 1.14 डॉलर आहे. त्यामुळे अमेरिका किती पुढे आहे याचा अंदाज येतो. तिथल्या 100 डॉलरसाठी भारताला 8765 रुपये खर्च करावे लागतील.