Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नाकी नऊ आणणारी महिला कोण?

| Updated on: Sep 02, 2021 | 8:03 PM

तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवला आहे. मात्र, अजूनही अफगाणिस्तानमधील काही भागावर अफगाण सरकारचं नियंत्रण आहे. यात उत्तर बाल्ख प्रांतातील चारकिंत जिल्ह्याचा समावेश आहे. हा भाग तालिबान्यांपासून सुरक्षित ठेवण्यात एका महिलेची मुख्य भूमिका आहे.

Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नाकी नऊ आणणारी महिला कोण?
Follow us on

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवला आहे. मात्र, अजूनही अफगाणिस्तानमधील काही भागावर अफगाण सरकारचं नियंत्रण आहे. यात उत्तर बाल्ख प्रांतातील चारकिंत जिल्ह्याचा समावेश आहे. हा भाग तालिबान्यांपासून सुरक्षित ठेवण्यात एका महिलेची मुख्य भूमिका आहे. या महिलेमुळेच तालिबानच्या नाकी नऊ आलेत. याचं कारणंही तसंच आहे. जो तालिबानने अफगाण सैन्याला माघार घ्यायला लावलीय त्या तालिबानशी टक्कर देणाऱ्या या महिलेचं नाव सलीमा मजारी (Salima Mazari) असं आहे. त्या बाल्ख प्रांताच्या गव्हर्नर आहेत.

महिला गवर्नरकडून तालिबान विरोधात मोहिम

गवर्नर सलीमा मजारी (Salima Mazari) अफगाणिस्तानमधील निवडक 3 महिला गवर्नरपैकी एक आहेत. त्या केवळ प्रशासकीय काम पाहत नाहीत, तर स्वतः हातात बंदूक घेऊन तालिबान्यांचा सामना करतात. उत्तमरित्या बंदूक चालवणाऱ्या सलीमा यांनी तालिबान्यांचा सामना करण्यासाठी त्यांनी एकीकडे सैन्याला आदेश दिले, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमधून सैन्यात भरती करत फौजफाटा तयार केला. त्यांच्यासाठी तालिबानसोबत लढणे ही त्यांची ऐतिहासिक जबाबदारी आहे.

सलीमा सांगतात, “कधी-कधी मला ऑफिसला असणं अपेक्षित असतं, तर कधी कधी स्वतःला बंदूक घेऊन लढाई लढावी लागते. स्वतःचे विचार आमच्यावर थोपवणाऱ्या कट्टरतावादी समहुांना थांबवण्यासाठी आम्ही लढलो नाही तर त्यांना पराभूत करण्याची शक्यता अगदी नगण्य होईल. ते जिंकतील आणि समाजावर त्यांचा अजेंडा थोपवतील.”

सलीमा मजारी (Salima Mazari) यांचा जन्म 1980 मध्ये इराणमध्ये झाला होता. त्यांचे आई वडील अफगाणिस्तानमध्येच राहायचे. मात्र, पुढे सोवियत युद्धाच्या काळात ते इराणला निघून गेले. समीला यांनी तेहरान विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं. यानंतर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये काम केलं. काही काळाने त्या पुन्हा अफगाणिस्तानला आल्या आणि चारकिंतमध्ये राहू लागल्या. हे ठिकाण आपल्या पूर्वजांचं ठिकाण असल्याचं त्या सांगतात.

स्वतंत्र सैन्याच्या तुकडीची निर्मिती

2018 मध्ये सलीमा मजारी (Salima Mazari) यांना चारकिंत जिल्ह्यातील गवर्नर पदाची निवडणूक होणार असल्याचं समजलं. त्यांनीही निवडणुकीत सहभाग घेतला. लोकांसाठी काम करण्याच्या त्यांच्या धडपडीमुळे त्या ही निवडणूक जिंकल्या. सुरुवातीला महिला म्हणून काम करताना अडचणी येतील असं त्यांना वाटलं, पण लोकांनी त्यांना खूप प्रेम आणि पाठिंबा दिला, असंही त्या सांगतात.

2 वर्षांपूर्वी सलीमा मजारी यांनी जिल्ह्यात एक सिक्युरिटी कमिशन तयार केलं. हे कमिशन स्थानिक लोकांना सैन्यात भरती करायचं काम करत. यामागे स्वतःच्या जिल्ह्याचं संरक्षण स्वतः करता यावं हा उद्देश होता. सध्या या तुकडीत 600 लोक आहेत. तेच सध्या चारकिंत जिल्ह्याच्या सीमेवर तैनात राहून जिल्ह्याचं तालिबान्यांपासून संरक्षण करत आहे.

हेही वाचा :

Afghanistan: अफगाणिस्तानची राजधानी काबुलही ढासळली, राष्ट्रपतींना वाचवायला अमेरिकन हेलिकॉप्टर, पुढे काय?

तालिबान्यांसमोर अफगान सरकार झुकले, सत्ता सोपवणार?; राष्ट्रपती भवनात खलबते सुरू

अफगाणिस्तानमध्ये बंदुका आणि रॉकेट घेऊन तालिबान्यांची खुलेआम दहशत, धडकी भरवणारी दृश्ये

व्हिडीओ पाहा :

Who is the Afghanistan women governor who fight against Taliban