Afghanistan: अफगाणिस्तानची राजधानी काबुलही ढासळली, राष्ट्रपतींना वाचवायला अमेरिकन हेलिकॉप्टर, पुढे काय?

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी हाहाकार माजवला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुल देखील सरकारच्या हातातून गेलीय. त्यामुळे शेवटचा किल्लाही ढासाळल्याची स्थिती तयार झालीय. तालिबान्यांनी आता संपूर्ण अफगाणवर आपलं वर्चस्व कायम केलंय.

Afghanistan: अफगाणिस्तानची राजधानी काबुलही ढासळली, राष्ट्रपतींना वाचवायला अमेरिकन हेलिकॉप्टर, पुढे काय?
काबूलवर तालिबानचा कब्जा
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 4:17 PM

काबुल : संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी हाहाकार माजवला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुल देखील सरकारच्या हातातून गेलीय. त्यामुळे शेवटचा किल्लाही ढासळल्याची स्थिती तयार झालीय. तालिबान्यांनी आता संपूर्ण अफगाणवर आपलं वर्चस्व कायम केलंय. त्यामुळे अफगाणिस्तानची वाटचाल पुन्हा धार्मिक कट्टरतावाद आणि शरिया कायद्याकडे होणार हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन राजदूत आणि अफगाण राष्ट्रपती अशरफ गनी यांना वाचण्यासाठी दुतावासाच्या छतावर अमेरिकेचे हेलिकॉप्टर उतरलेत. यावरुन आता अफगाण सरकारनं शरणागती पत्करल्याचं स्पष्ट आहे.

तालिबानी काबुल शहरात घुसले आहेत. तालिबानकडून राजधानीत हिंसा न करण्याचे निर्देश देण्यात आल्यानं अद्याप शहरातील हिंसेचं वातावरण नाही. याशिवाय लोकांनाही तिथून जाण्याची परवानगी देण्यात आलीय, अशी माहिती वृत्तसंस्था एफपीने दिलीय.

अमेरिकन राजदुतावासातील संवेदनशील कागदपत्रे जाळली

तालिबानने काबुलवरही ताबा मिळवण्यास सुरुवात केल्यानं अमेरिकेने दुतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना गुप्त सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केलीय. याशिवाय दुतावासातील गुप्त आणि महत्त्वाचे कागदपत्रं जाळून टाकण्यात आली आहेत.

सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या

अशरफ गनी यांनी शनिवारी दूरदर्शनद्वारे राष्ट्राला संबोधित केले. तालिबानने अलिकडच्या दिवसांत प्रमुख क्षेत्रांवर कब्जा केल्यानंतर ही त्यांची पहिली सार्वजनिक भाषण केलं आहे. एकीकडे अमेरिका आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न तीव्र करत आहे. तर, दुसरीकडे हजारो नागरिक काबूलमधील उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये आश्रय घेत आहेत. रविवारी काबूलमध्ये शांतता होती परंतु अनेक एटीएममधून पैसे काढणे बंद करण्यात आले होते, शेकडो लोक खाजगी बँकांबाहेर जमले होते.

तालिबानने रविवारी सकाळी काही छायाचित्रे ऑनलाईन प्रसिद्ध केली. ज्यात नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद येथील राज्यपाल कार्यालयात तालिबानचे लोक पाहायला मिळत आहेत. प्रांताचे खासदार अबरुल्ला मुराद यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की अतिरेक्यांनी जलालाबाद ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानचा मोठा भाग काबीज केला होता. त्यानंतर अफगाणिस्तानच्या केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. दुसरीकडे, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा यांनी त्यांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सैन्य पाठवले आहे.

मैदान वर्दकही सरकारच्या हातातून निसटले

अतिरेक्यांनी रविवारी मैदान वर्दकची राजधानी काबीज केली.ते काबूलपासून 90 किमी दूर आहे. अफगाणिस्तानचे चौथे सर्वात मोठे शहर, मजार-ए-शरीफ, तालिबान्यांनी शनिवारी संपूर्ण हल्ल्यानंतर ताब्यात घेतले आणि त्याच्याबरोबर संपूर्ण उत्तर अफगाणिस्तान अतिरेक्यांनी ताब्यात घेतला. दोन प्रादेशिक लष्करी प्रमुख अट्टा मोहम्मद नूर आणि अब्दुल रशीद दोस्तम शनिवारी उझबेकिस्तानला पळून गेले.

हेही वाचा :

तालिबान्यांसमोर अफगान सरकार झुकले, सत्ता सोपवणार?; राष्ट्रपती भवनात खलबते सुरू

अफगाणिस्तानमध्ये बंदुका आणि रॉकेट घेऊन तालिबान्यांची खुलेआम दहशत, धडकी भरवणारी दृश्ये

अफगाणिस्तानमध्ये तांडव, 10 प्रमुख शहरांवर कब्जा, तालिबान पुन्हा सत्तेत येणार?

व्हिडीओ पाहा :

Taliban capture Afghanistan capital Kabul Know what next

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.