इराणचा नवा सर्वेच्च नेता कोण? कोणत्याही क्षणी होणार नव्या नावाची घोषणा, अमेरिका, इस्त्रायलची झोप उडाली

मोठी बातमी समोर येत आहे, आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आता इराणमध्ये पुन्हा एकदा सर्वोच्च नेता निवडीच्या हालचालींना वेग आला आहे, येत्या एक ते दोन दिवसांमध्ये सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा होणार आहे.

इराणचा नवा सर्वेच्च नेता कोण? कोणत्याही क्षणी होणार नव्या नावाची घोषणा, अमेरिका, इस्त्रायलची झोप उडाली
Iran
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 5:20 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धाचा आज 9 वा दिवस आहे. या नऊ दिवसांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराण जेवढ्यावेळेस आपल्या सर्वोच्च नेत्यांची निवड करेल तेवढ्या सर्व सर्वोच्च नेत्यांना आम्ही मारू अशी धमकी इस्त्रायलकडून इराणला देण्यात आली आहे. आता मोठी बातमी समोर येत असून, इराणमध्ये सर्वोच्च नेता निवडीच्या घडामोडींना वेग आला आहे. इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार देशातील मौलवी आणि संबंधित कमेटी सर्वोच्च नेता निवडीच्या जवळ पोहोचली असून, पुढील एक – दोन दिवसांमध्ये इराणकडून सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान इराणने आपला सर्वोच्च नेता निवडला असल्याची चर्चा सुरू आहे, ही चर्चा सुरू असतानाच आता इस्त्रायलकडून पुन्हा एकदा इराणला सर्वोच्च नेत्याला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

मेहर वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. संबंधित संस्था येत्या एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे. सध्या इराणमध्ये यु्द्धाचं वातावरण आहे, त्यामुळे या संदर्भात असेंबलीमध्ये बैठक घेणं शक्य नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च नेता निवडीसाठी वेळ लागत आहे.

इस्त्रायलची पुन्हा धमकी

दरम्यान सध्या इराणमध्ये नवा सर्वोच्च नेता निवडीची चर्चा सुरू आहे, याच दरम्यान पुन्हा एकदा इस्त्रायलकडून इराणला धमकी देण्यात आली आहे. इराण जेवढ्या वेळेस सर्वोच्च नेता निवडेल तेवढ्या वेळेस आम्ही त्याला मारून टाकू असं इस्त्रायलने म्हटलं आहे. याबाबत इस्त्रायलकडून सोशल मीडिय़ावर एक पोस्ट देखील करण्यात आली आहे, इराणमध्ये सध्या नवा नेता निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र आम्ही त्या यशस्वी होऊ देणार नाही, असं इस्त्रायलने म्हटलं आहे. दरम्यान जर इराणने आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा केली तर अमेरिका आणि इस्त्रायलसमोरील अडचणी आणखी वाढू शकतात. कारण सर्वोच्च नेत्याच्या निवडीनंतर इराणी सेना पुन्हा एकदा नव्या जोमानं अमेरिका आणि इस्त्रायलच्या विरोधात मैदानात उतरू शकते.

Follow Us