AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who Was Charlie Kirk : अमेरिकेत खळबळ, ट्रम्प यांच्या निकवटर्तीयाची भर सभेत हत्या, चार्ली कर्क कोण आहेत?

Who Was Charlie Kirk :एखाद्या चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या करण्यात आली. विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करत असताना चार्ली कर्क यांच्यावर गोळी झाडण्यात आली. हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सुद्धा झटका आहे. हे चार्ली कर्क कोण होते? त्यांचं कार्य काय? जाणून घ्या.

Who Was Charlie Kirk : अमेरिकेत खळबळ, ट्रम्प यांच्या निकवटर्तीयाची भर सभेत हत्या, चार्ली कर्क कोण आहेत?
charlie kirk
| Updated on: Sep 11, 2025 | 9:13 AM
Share

अमेरिकेच्या ओरेम येथील यूटा वॅली यूनिवर्सिटीमध्ये बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. कर्क यूनिवर्सिटीच्या कंजर्वेटिव विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करत असताना त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. कर्क यांच्या निधनावर राष्ट्रपती ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला आहे.कंजर्वेटिव कार्यकर्ता चार्ली कर्क हे युवकांची संघटना टर्निंग पॉइंट यूएसएचे सीईओ आणि सह-संस्थापक होते. चार्ली कर्क अवघ्या 31 वर्षांचे होते. यूनिवर्सिटीत ते भाषण देत असताना त्यांच्यावर गोळी चालवण्यात आली. “अमेरिकेत युवकांचं मन चार्ली इतकं कोणी चांगलं समजू शकत नव्हतं. मी त्याला खूप प्रेम आणि सन्मान द्यायचो. तो आता आपल्यामध्ये नाहीय. मेलानिया आणि मी त्याची पत्नी एरिका आणि त्याच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. चाली, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो!” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

व्हाइट हाऊसच्या पोस्टनुसार, चार्ली कर्क यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती ट्रम्प यांनी संपूर्ण अमेरिकेत सर्व अमेरिकन झेंडे अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिलेत. कर्क एक कंजर्वेटिव प्रभावशाली व्यक्ती होते. ते टर्निंग पॉइंट यूएसएचे संस्थापक होते. 2012 साली वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने टर्निंग पॉइंटची सुरुवात केलेली. टर्निंग पॉइंट ही अमेरिकन शाळा आणि महाविद्यालय परिसरात कंजर्वेटिव राजकारणाला प्रोत्साहन देणारी संघटना आहे. चार्ली कर्क यांनी वर्ष 2024 साली मिल्वॉकी येथे आयोजित रिपब्लिकन नॅशनल कन्वेंशनमध्ये भाषण दिलं होतं. तिथे ते युवकांबद्दल बोललेले.

‘द अमेरिकन कमबॅक टूर’

कर्क संपूर्ण अमेरिकेत कॉलेजेसमध्ये डिबेट शो साठी राष्ट्रीय दौरा सुरु करणार होते, त्याचवेळी ही हत्या झाली. या दौऱ्याला ‘द अमेरिकन कमबॅक टूर’ नाव देण्यात आलं होतं. या अंतर्गत कोलोराडो स्टेट यूनिवर्सिटी, यूनिवर्सिटी ऑफ मिनेसोटा सह अन्य कॉलेज परिसरात ते थांबणार होते. त्याशिवाय कर्क यांचा 25 सप्टेंबरला डार्टमाउथ कॉलेजमध्ये प्रोग्रेसिव प्रभावशाली व्यक्ती हसन पाइकर यांच्यासोबत एक डिबेट होणार होती.

रिपब्लिकन पार्टीत उदयोन्मुख स्टार म्हणून पुढे आले

मागच्या 10 वर्षात कर्क रिपब्लिकन पार्टीत उदयोन्मुख स्टार म्हणून पुढे आलेले. त्यांनी फक्त आपली ऑनलाइन ओळखच मजबूत बनवली नाही, तर रिपब्लिकन पार्टीच्या आता टर्निंग पॉइंटला एक प्रभावी संघटना बनवलं. वर्ष 2016 मध्ये रिपब्लिकन कन्वेंशनमध्ये दिलेल्या एका भाषणाने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यावेळी ते फक्त 22 वर्षांचे होते. त्यानंतर दोन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कर्क यांची संघटना एका राष्ट्रीय राजकीय ताकद बनली. स्विंग-स्टेट्स वाल्या राज्यात जनमत रिपब्लिकनच्या बाजूने वळवण्यासाठी ही संघटना काम करायची.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.