
इस्रायलने सोमवारी इराणची राजधानी तेहरानजवळ हवाई हल्ले केले. त्यापैकी एक हल्ला कथितपणे इविन तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर झाला. इराणी सरकारी टीव्हीनुसार, हा कुख्यात तुरुंग दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्ती आणि पाश्चिमात्य कैद्यांना ठेवण्यासाठी ओळखला जातो. याचा उपयोग अनेकदा पश्चिमेकडील देशांशी चर्चेत फायदा मिळवण्यासाठी केला जातो. तेहरानच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात असलेला इविन तुरुंग हा इराणमधील सर्वात धोकादायक केंद्र आहे. याला अनेकदा इस्लामिक गणराज्याच्या न्यायव्यवस्थेचा ब्लॅक होल म्हणतात. यात राजकीय कैदी, पत्रकार, कार्यकर्ते, दुहेरी नागरिकत्व असलेले आणि परदेशी कैदी ठेवले जातात. त्यापैकी अनेकांना निष्पक्ष सुनावणीशिवाय तुरुंगात डांबले जाते. इविन तुरुंगाचा कारभार इराणच्या गुप्तचर मंत्रालय आणि इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) यांच्याद्वारे चालवला जातो. रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स हा इराणमधील एक शक्तिशाली बल आहे. जे थेट सर्वोच्च नेता अयातुल्लाह अली खामनेई यांना अहवाल करते. इराणच्या एका वृत्तसंस्थेने, मिझानने, इविन तुरुंगावरील इस्रायली हल्ल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, तुरुंगाचा...