
इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल पूर्ण शक्तीनिशी युद्ध लढत आहेत. त्यांनी इराणचे अणवस्त्र प्रकल्प, तेल कारखाने आणि अन्य सैन्य तळांवर हवाई हल्ले केले आहेत. पण एक छोट्स बेट अजूनपर्यंत पूर्णपणे सुरक्षित आहे. हे बेट आहे खार्ग आयलँड. हे इराणचं सर्वात महत्वाचं तेल निर्यात केंद्र आहे. अमेरिका किंवा इस्रायलने या बेटावर हल्ला केला तर इराणची सर्व अर्थव्यवस्था ठप्प होऊन जाईल. जगात तेलाच्या किंमती गगनाला भिडतील. हा हल्ला इतका मोठा झटका असेल की त्यामुळे तिसरं विश्व युद्ध सुरु होईल असं एक्सपर्ट्सच म्हणणं आहे.
खार्ग आयलँड इराणच्या किनाऱ्यापासून 25 किलोमीटर अंतरावर उत्तर फारस खाडीमध्ये एक छोट्स कोरल बेट आहे. याची लांबी काही किलोमीटर आहे. 1960 च्या दशकात अमेरिकी तेल कंपनीने हे बेट बनवलं होतं. आज हे बेट इराणचं मुख्य तेल निर्यात टर्मिनल आहे. इथे दररोज 70 लाख बॅरल तेल लोड केलं जाऊ शकतं. या बेटाशिवाय इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल. माजी अमेरिकी विशेष दूत रिचर्ड नेप्यू म्हणाले की, या बेटाशिवाय इराणची अर्थव्यवस्था तळाला जाईल.
अमेरिका या बेटाला का स्पर्श करत नाहीय?
अमेरिका-इस्रायलने इराणमधील अनेक तेल ठिकाणांवर हल्ले केलेत. पण खार्ग आयलँडला अजून स्पर्शही केलेला नाही. याचं कारण स्पष्ट आहे, या बेटावर हल्ला केल्यास इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त होईल. जगभरातील तेल बाजारात मोठ्या प्रमाणात उलथा-पालथ होईल. तेलाचे भाव प्रचंड वाढतील. चीनला सर्वात जास्त फटका बसेल. कारण चीन इराणकडून सर्वाधिक तेल खरेदी करतो.
किंवा विश्व युद्धाची वेळ येईल
हडसन इंस्टीट्यूटचे तज्ञ मायकल डोरन म्हणाले की, अमेरिकी प्रशासनाला युद्धामध्ये इराणी अर्थव्यवस्थेचा आधार नष्ट करायचा नाहीय. ही अमेरिकेची जुनी रेड लाइन आहे. हे बेट नष्ट झाल्यास इराण इतका चिडेल की ते पूर्ण क्षेत्रात मोठे हल्ले करतील किंवा विश्व युद्धाची वेळ येईल.
पण अमेरिका मुद्दामून असं करत नाहीय
खार्ग आयलँडवर तेलाचे मोठमोठ स्टोरेज टँक आहेत . एक लांब जेट्टी समुद्रात आहे. तिथे सुपर टँकर तेल भरतात. समुद्राखाली पाईपलाईन मुख्य भूमीच्या सर्वात मोठ्या तेल क्षेत्राशी जोडलेली आहे. संपूर्ण बेट छोटं आणि खुलं आहे. म्हणून ते हवाई हल्ल्यात नष्ट करणं सोप आहे. पण अमेरिका मुद्दामून असं करत नाहीय.