Strait Of Hormuz : सुपरपावर अमेरिकाच नाही, तर जगातला कुठलाही देश स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये का घुसू शकत नाही?
Strait Of Hormuz : तुमच्याकडे मोठं सैन्य, आधुनिक शस्त्र आहेत म्हणून तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही. स्मार्ट भूगोल आणि स्वस्त शस्त्र सुद्धा निर्णायक ठरु शकतात. हेच इराण युद्धाने दाखवून दिलय. स्ट्रेट ऑफ होर्मुजची नैसर्गिक रचनाच अशी आहे की, कुठल्याही देशाला तिथे घुसणं सोपं नाही.

इराण विरुद्ध युद्ध सुरु झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचं महत्व सगळ्या जगाच्या लक्षात आलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा रणनितीक फायद्यासाठी अशा पद्धतीने वापर होईल, असा युद्ध सुरु होण्याआधी क्वचितच कुठल्या देशाने विचार केला असेल. जर, कुठल्या देशाला अशी कल्पना असती, तर त्यांनी आधीच तेलाचे साठे करुन ठेवले असते. तेलाच्या टंचाईमुळे लॉकडाऊन सारख्या उपायोजना कराव्या लागल्या नसत्या. अमेरिका आणि इस्रायल या दोन बलाढ्य देशांसमोर तुलनेने इराणची सैन्य शक्ती कमी आहे. पण आपल्याकडे जे आहे, त्याचा खुबीने कसा वापर करायचा? त्याचं कौशल्य या युद्धात इराणकडून शिकावं लागेल. इस्रायल-अमेरिकेकडे जगताली शक्तीशाली फायटर जेट्स, बॉम्ब आहेत. इराणकडे लढाऊ विमानं नाहीत. त्यांच्याकडे दोनचं मुख्य अस्त्र होती. शाहेद ड्रोन आणि वेगवेगळ्या रेंजची मिसाईल्स आणि तिसरं अस्त्र म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज. इराणने शाहेद ड्रोन्स आणि मिसाइल्सच्या बळावर अमेरिका-इस्रायलशी झुंज दिली. महिन्याभराच्या आत इराण कोसळले हे अनेकांचा अंदाज चुकला. उलट 38 दिवसाच्या युद्धानंतरही इराण मजबुतीने अमेरिका-इस्रायल या देशांसमोर...