ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात सर्वांसमोरच का झाला वाद? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
रशिया आणि युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. 24 फेब्रुवारी 2022 ला या दोन्ही देशात युद्ध सुरु झालं होतं. मात्र अजूनही युद्धाची आग धगधगती आहे. त्याचा परिणाम सर्वच जगावर होत आहे. त्यामुळे हे युद्धातून योग्य तो तोडगा निघावा अशी अनेकांची इच्छा आहे. असं असताना ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्या व्हिडीओने नव्या वादाला फोडणी दिली आहे.

व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्यातील व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. खरं तर दोन देशात कितीही वाद असला तरी बंद दाराआड चर्चा केली जाते. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिडियासमोरच झेलेंस्की यांना झापलं. त्यावर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की गप्प बसतील असं होईल का? त्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे हा वाद जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. खरं तर ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात एक साधी भेट होती, मात्र त्याचं रुपांतर वादात झालं. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी या भेटीत थेट झेलेंस्की यांच्यासमोर युद्धाचा मुद्दा छेडला. या आरोपाची री ओढत ट्रम्प यांनी सांगितलं की, झेलेंस्की यांना शांतता नको आहे आणि जर त्यांना ऐकायचं नसेल तर अमेरिका या युद्धातून बाहेर पडेल. यावर झेलेंस्की यांनी उत्तर दिलं की, आम्हाला हमीसह युद्धबंदी हवी आहे. पण प्रकरण इथेच शांत होईल असं शक्य नाही. यामुळे आता नव्या युद्धाच्या बिजाची पेरणी होत असल्याचं दिसत आहे. ...