जगावर मोठं संकट, अल-निनोचा मोठा दणका; तापमान प्रचंड वाढणार, भारतालाही अलर्ट

El Nino : WMO च्या माहितीनुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत अल निनो अधिक सक्रीय होत आहे, त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

जगावर मोठं संकट, अल-निनोचा मोठा दणका; तापमान प्रचंड वाढणार, भारतालाही अलर्ट
El nino Heatwave Alert
Image Credit source: Google
| Updated on: Aug 05, 2026 | 6:29 PM

जागतिक हवामान संस्थेने हवामानाबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये जगातील अनेक भागांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. WMO च्या माहितीनुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत अल निनो अधिक सक्रीय होत आहे, त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जागतिक हवामान संस्थेने सांगितले की, अल-नीनोची तीव्रता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांत उष्णतेची लाट वाढू शकते, तसेच पावसाचे स्वरूप आणि वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समुद्राचे तापमान आधीच सरासरीपेक्षा अधिक असल्याने हवामानावरील परिणाम आणखी तीव्र होऊ शकतो. त्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

अल-निनोमुळे उष्णता वाढणार

WMO च्या अहवालानुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत जगातील बहुतांश भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यात भारत, आफ्रिका, युरोपमधील काही भाग, अरब देश, पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिका यांचा समावेश आहे. या वाढणाऱ्या तापमानामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, याचा शेती क्षेत्राला सर्वाधिक फटका बसू शकतो.

WMO ने हेही सांगितले की, यावेळी अल-नीनो अशा काळात तीव्र होत आहे, जेव्हा जगातील समुद्र आधीच असामान्यपणे उष्ण आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान प्रशांत महासागरातील काही भागांमध्ये समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा सुमारे 2.9 अंश सेल्सिअसने अधिक राहू शकते. याचा परिणाम अनेक देशांच्या हवामानावर होऊ शकतो.

भारतात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

एल निनोमुळे भारतात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. WMO च्या अंदाजानुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर सकारात्मक इंडियन ओशन डिपोल तयार होण्याचे संकेतही मिळाले असून, त्याचाही हवामानावर परिणाम होऊ शकतो. अल-नीनो आणि IOD हे दोन्ही घटक एकत्रितपणे काही भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण करू शकतात, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us