AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BRICS Summit : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं महत्व वाढू नये यासाठी BRICS समीटआधी चीनचा नवीन डाव, जिनपिंग अजूनही…

भारतात शी जिनपिंग यांचा दौरा होण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्याकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

BRICS Summit : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं महत्व वाढू नये यासाठी BRICS समीटआधी चीनचा नवीन डाव, जिनपिंग अजूनही...
india chinaImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 8:24 AM
Share

भारतात होणाऱ्या BRICS शिखर परिषदेला चीनने पाठिंबा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नवी दिल्लीत येण्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. ब्रिक्स शिखर परिषद 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत भारतात होणार आहे. यंदाचं ब्रिक्स शिखर परिषद ही भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलं आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी ब्रिक्स शिखर परिषदेवर भाष्य केलं आहे. त्यांना चीन ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार का, याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी म्हटलं की, आम्ही ब्रिक्स शिखर परिषदेला सहकार्य करण्यास महत्व देतो. भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी आोयजनाला पाठिंबा देतो. परंतु या परिषदेत चीनकडून शी जीनपिंग सहभागी होणार का, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. ब्रिक्स शिखर परिषदेतर्फ नवीन माहिती देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं महत्व वाढू नये, यासाठी ब्रिक्स शिखर परिषदेआधी चीन डाव आखत असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु त्याला कोणीही अधिृत दुजोरा दिलेला नाही.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चीनच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शी जिनपिंग यांना ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारताच्या दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणानंतर जिनपिंग यांनी भारताचे आभार मानले होते. तसेच चीनने भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शी जिनपिंग भारतात येणार असल्याची चर्चा होती. परंतु अद्याप त्यांनी भारताच्या दौऱ्याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. येत्या 8 सप्टेंबरपर्यंत चीनकडून भारत दौऱ्याविषयी माहिती देण्यात आलेली नाही . मागील महिन्यात रायटर्सच्या तीन सूत्रांनी माहिती दिली होती की, शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. चिनी अधिकारी एका शिष्टमंडळाची तयारी करत होते. शी जिनपिंग यांचा 7 वर्षांनंतर भारताचा दौरा आहे. परंतु त्यांच्या दौऱ्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण