हो,आम्ही अंतराळात शस्रे तैनात केलीत,अमेरिकेची पहिल्यांदा कबुली, अंतराळ युद्धाचा धोका वाढला..
या प्रकारे एका देशाची सैन्य तयारी दुसऱ्या देशाला देखील आपली ताकद वाढवण्यास प्रेरित करु शकतो. यामुळे अंतराळात शस्रास्रांची स्पर्धा आणखीच वेगवान होण्याचा धोका वाढला आहे.

अमेरिकेने पहिल्यांदाच कबुली दिली आहे की त्यांनी अंतराळात शस्रे तैनात केली आहेत. अमेरिकन वायू दलाचे सचिव ट्रॉय मिंक यांनी सोमवारी याची माहिती दिली. ते म्हणाले की अमेरिकेकडे ऑर्बिटमध्ये अशी शस्रास्रे आहेत.ज्यांचा वापर गरज लागल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याला शत्रू सैन्यांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेले नाही की हे शस्रास्रे अखेर कोणत्या प्रकारची आहेत ? किती आहेत आणि यांना अंतराळात केव्हा पाठवण्यात आले होते. अमेरिकेचा हा खुलासा अशावेळी झाला आहे जेव्हा अमेरिका, रशिया आणि चीन दरम्यान अंतराळात आपली शक्ती वाढवण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. यामुळे अंतराळात शस्रास्रांची स्पर्धा आणखी वेगवान होण्याची शक्यता वाढली आहे.
अमेरिकेच्या कबुलीने उलट नुकसान
अमेरिका दीर्घकाळापासून रशिया आणि चीनच्या वाढत्या अंतराळ सैन्य ताकदी संदर्भात चिंतीत होता. आजच्या युद्धात सॅटेलाईट खूप गरजेचे असते. सैन्य दल याचा वापर एकमेकांशी संपर्क करणे, रस्ता शोधणो, गुप्त माहीती जमा करणे आणि क्षेपणास्रांवर नजर राखण्या सारखे काम करता येणार आहे. अशात जर कोणत्या देशाने सॅटेलाईटवर हल्ला केला तर त्याची सैन्य ताकद कमजोर होऊ शकते. यासाठी आता मोठ्या सैन्य शक्ती आता केवल नवीन उपग्रह बनवण्यावर लक्ष ठेवत नाहीतर तर सॅटेलाईटला शत्रूच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आणि गरज पडल्यानंतर दुसऱ्या देशाची अंतराळ सिस्टीमची रोखण्याची क्षमता देखील विकसित करत आहेत.
तज्ज्ञांना वाटतेय भीती….
तज्ज्ञांना आता भीती वाटतेय की अमेरिकेच्या या खुलाशानंतर रशिया आणि चीन देखील अंतरळात आपली सैन्य ताकदी वाढवू शकतो. त्यामुळे ते अमेरिकेच्या पावलाला आपल्या सुरक्षेसाठी खतरा समजून नवी तंत्रज्ञान आणि शस्रे विकसित करण्यास पुढाकार घेऊ शकतो.