तरुणीला भविष्य आधीच कळालं , आईला पाठवलेला मेसेज खरा ठरला; कारमधील दृश्य पाहून आख्खी कॉलनी हादरली

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, तरुणीनं गमतीनं केलेला मेसेज खरा ठरला. या घटनेमुळे तेथील रहिवाशांना प्रचंड धक्क बसला आहे.

तरुणीला भविष्य आधीच कळालं , आईला पाठवलेला मेसेज खरा ठरला; कारमधील दृश्य पाहून आख्खी कॉलनी हादरली
| Updated on: Jan 26, 2025 | 9:49 PM

पेंसिल्वेनियाची रहिवासी असलेल्या मॅरीन ब्रेगिगनने 31 जानेवारी 2021 ला आपल्या आईला एक मेसेज केला होता. ज्यामध्ये तीने लिहीलं होतं की ‘तू घरी पोहोचली आहे का? तु जीवंत तर आहेस ना?’. पण तिला या गोष्टीची साधी भनक देखील नव्हती. की तीने जेव्हा तिच्या आईला हा मेसेज केला होता, त्याचवेळी घराच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये तिच्या आईचा मृत्यू झाला होता. याबाबत न्यूयॉर्क पोस्टने माहिती दिली आहे.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॅरीनने म्हटलं आहे की, जेव्हा मी माझ्या आईला मेसेज पाठवला तेव्हा तिने उत्तर दिलं नाही. मात्र मी देखील फार काही त्याबाबत विचार केला नाही. असं अनेक वेळा व्हायचं की जेव्हा माझी आई तिच्या कारने घरी पोहोचायची तेव्हा ती झोपी जायची. मला वाटलं ती झोपली असावी म्हणून मी तिच्या उत्तराची वाट पाहिली नाही. दुसऱ्या दिवशी मला तिची भेट घेण्यासाठी घरी पोहोचायचे होते. आम्ही दिवसातला बराच वेळ एकमेकांसोबत घालत होतो. अशी काही घटना घडेल हे मला माहिती देखील नव्हतं. या घटनेनं मला प्रचंड धक्का बसला.

पुढे बोलताना ती म्हणाली माझ्या आईचं निधन हे कार्डियाक अरेस्टमुळे झालं. गेल्या काही दिवसांपासून माझ्या आईला आजाराने ग्रासलं होतं. तीची किडनी देखील खराब झाली होती. त्याच दरम्यान तिला कार्डियाक अरेस्ट आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मला माझ्या आईच्या निधनाचा प्रचंड धक्का बसला. मॅरीनच्या होणाऱ्या पतीला तिच्या आईचा मृतदेह तिच्या घराजवळ उभ्या असलेल्या बंद कारमध्ये आढळून आला. त्यानंतर त्याने या घटनेची माहिती मॅरीनला दिली, मी धक्क्यातून सावरत या गोष्टीची माहिती माझ्या वडिलांना दिली. त्यावेळी माझे वडील घरीच होते.आम्ही तिला डॉक्टरांकडे नेलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं, अशी मॅरीनने म्हटलं आहे. हा योगायोग होता, मात्र ही घटना मी कधीही विसरू शकणार नाही असंही तिने यावेळी म्हटलं आहे.