युद्धादरम्यान पुतिनची मोठी कारवाई, झुकेरबर्गची कंपनी मेटा दहशतवादी संघटना घोषित

मेटा ही फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी आहे. या वर्षी मार्चच्या अखेरीस रशियाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अतिरेकी कारवाया केल्याबद्दल बंदी घातली.

युद्धादरम्यान पुतिनची मोठी कारवाई, झुकेरबर्गची कंपनी मेटा दहशतवादी संघटना घोषित
मेटा
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 7:55 PM

मुंबई,  रशियाने मार्क झुकेरबर्गची कंपनी मेटा (Zuckerberg’s company Meta) विरोधात अभूतपूर्व पावले उचलले असून तिचा समावेश दहशतवादी आणि अतिरेकी संघटनेच्या यादीत (Listed as a terrorist organization) केला आहे. मेटा ही फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी आहे. या वर्षी मार्चच्या अखेरीस रशियाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अतिरेकी कारवाया केल्याबद्दल बंदी घातली. युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी मेटावर रुसोफोबियाचा आरोप केला.

रशियाने युक्रेनच्या पॉवर स्टेशनवर हल्ले सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे पाऊल उचलण्यात आले आहे. क्रिमियन पूल उडवल्यानंतर रशियाने युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे.

रशियानेही मार्क झुकेरबर्गवर लादले होते निर्बंध

युक्रेन आणि रशियामधील युद्धानंतर रशियावर निर्बंध लादले जाऊ लागले. अमेरिकेने रशियावर विविध निर्बंध लादले. याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात रशियानेही अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना रशियात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. त्यात मार्क झुकेरबर्गचेही नाव होते.

युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून फेसबुकवर लोकांच्या तिखट प्रतिक्रियांसाठी रशिया सोशल मीडिया कंपनीला दोषी ठरवत आहे. त्यांनी आपल्या देशात फेसबुकवरही बंदी घातली. आता त्याने आपली मूळ कंपनी मेटाला दहशतवादी आणि अतिरेकी संघटनेच्या यादीत टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

 

क्रिमियन पुलावरील हल्ल्याचे प्रतिउत्तर

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नंतर सांगितले की, युक्रेनवरील हल्ले हे मॉस्को-नियंत्रित क्रिमियन द्वीपकल्पातील पुलावरील हल्ल्यासह कीवच्या दहशतवादी कारवायांच्या प्रत्युत्तरात होते. अनेक तास चाललेल्या या भीषण हल्ल्याने मॉस्कोने अचानक केलेल्या लष्करी हल्ल्यांची तीव्रता दर्शवली.

एक दिवस अगोदर, पुतिन यांनी शनिवारी रशियाला क्रिमिया-व्याप्त प्रदेशाशी जोडणाऱ्या एका प्रचंड पुलावरील स्फोटाला युक्रेनियन विशेष सेवांनी नियोजित केलेले आणि  दहशतवादी कृत्य म्हटले.