AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात मोठा बदल, आज दिवसभर..

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात मोठा बदल, आज दिवसभर..
Cloudy weather
| Updated on: Feb 07, 2026 | 7:37 AM
Share

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. देशातील काही भागात कडाक्याची थंडी आहे तर कुठे पाऊस सुरू आहे. उत्तरेकडे थंडी असून धुकेही मोठ्या प्रमाणात पडले. केरळ, तामिळनाडूसह काही राज्यात पाऊस आहे. मात्र, राज्यात उकाडा जाणवत आहे. सकाळी थोड्या प्रमाणात थंडी जाणवते आणि दुपारी उकाडा आहे. डिसेंबर महिन्यात राज्यात थंडी चांगली होती. मात्र, जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच वातावरणात बदल होताना दिसला. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी अधिक असण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने अगोदरच वर्तवला होता. वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने वातावरणात मोठा बदल झाला. त्यामध्येच काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पाऊसही हजेरी लावताना दिसत आहे. वायू प्रदूषणही काही शहरांमध्ये प्रचंड वाढले आहे.

राज्यातील आजचे हवामान कसे असणार ते जाणून घ्या

राज्यातील ढगाळ वातारणामुळे तापमानात चढउतार बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल. राजस्थानच्या सिकार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. सिकार येथे नीचांकी 4.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.

भारतीय हवामान विभागाचा अत्यंत मोठा अंदाज

निफाड येथे 10.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद कोकणातील भिरा येथे झाली असून तिथे 37 अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यात आज दिवसभर सामान्य तापमान राहिल. मात्र, तापमानात चढउतार बघायला मिळेल. राज्यातील इतर राज्यांंमध्ये आज काही ठिकाणी अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. काही राज्यांमध्ये सतत पाऊस सुरू आहे.

 या राज्यामुळे थेट मुसळधार पावसाचा इशारा

6 फेब्रुवारी ते 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पश्चिम हिमालयीन प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवस या भागात पाऊस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...