AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचे १० देश जेथे सापांचा वावर मोठा, भारतात किती आहेत प्रजाती ?

जगातील अनेक देशात सरपटणारे जीव आणि सांपाचे प्रमाण जास्त आहे. या देशात वावरताना खूपच काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जगातील सर्वाधिक साप आढणारे दहा देश पाहूयात...

जगाचे १० देश जेथे सापांचा वावर मोठा, भारतात किती आहेत प्रजाती ?
green snake
| Updated on: May 10, 2026 | 6:43 PM
Share

सापाचे नाव जरी घेतले तरी अनेकांना धडकी भरते. कारण सापाच्या दंशाने माणसाचे प्राण जाऊ शकतात. जगात सापांच्या अनेक जाती आहे.त्यातील काही विषारी आहेत तर काही बिनविषारी आहेत. ‘द रेप्टाइल डेटाबेस’ या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन डेटाबेसनुसार जगातील सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती जतन केली जाते. या संस्थेच्या मते जगात ४,१०० हून अधिक सापांच्या प्रजाती आहेत. प्रत्येक वर्षी नवीन प्रजाती सापडत आहे. Amazon, द.आशिया आणि पावसाच्या प्रदेशात नवीन सरीसृप (सरपटणारे प्राणी) शोधले जात आहेत. मात्र, काही असे देश आहेत जेथे सापांची संख्या आणि विविधता जास्त आहे. हे देश वाईल्डलाईफ प्रेमी आणि एडव्हेंचर ट्रॅव्हलर्ससाठी खास आकर्षण बनले आहेत. मात्र, या प्रांतात फिरण्याआधी योग्य सावधानता बाळगली पाहिजे.

मॅक्सिको आणि ब्राझील स्नेक डायव्हर्सिटी हॉटस्पॉट

बातमीनुसार मॅक्सिकोमध्ये सापांच्या सुमारे ४३८ प्रजातींचे साप आहेत. येथे वाळवंट, जंगल आणि पर्वतमय प्रदेश सांपासाठी आदर्श मानले जातात. Baja California आणि Yucatan Peninsula सारखे भागात रॅटलस्नेक सापडणे सर्वसामान्य आहे. तर ब्राझीलमध्ये सापांच्या ४२० हून जास्त प्रजाती आहेत. Amazonचे रेनफॉरेस्ट जगातील सर्वाधिक सापांचे क्षेत्र म्हटले जाते. येथे विशाल एनाकोंडापासून अनेक प्रकारचे साप आढळतात.

भारतात ‘बिग फोर’ चा सर्वात जास्त धोका

भारतात ३०० हून जास्त सापांच्या प्रजाती आहेत. यात ‘बिग फोर’ सर्वात जास्त खतरनाक मानले जातात. कॉमन क्रेट ( साधा मण्यार ), रसेल वायपर ( घोणस ), सॉ-स्केल्ड वायपर ( फुरसे ) आणि स्पेक्टेकल्ड कोब्रा ( भारतीय नाग ) भारतात होणाऱ्या ९० टक्के सर्प दंशाच्या घटनांना जबाबदार असतात. पश्चिम घाट, सुंदरबन आणि मध्य भारतीय जंगलात यांचे वास्तव्य आढळते. या भागात मान्सूनमध्ये खास काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियातही हाय रिस्क

इंडोनेशियात सापाच्या ३७६ प्रजाती आढळतात. ज्यात समुद्री विषारी साप आणि मोठे अजगर यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात विषारी सापांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील वैद्यकीय सिस्टीम खूप मजबूत मानली जाते. तज्ज्ञांनुसार जंगलात आणि किनारपट्टीत फिरताना नेहमी लोकल गाईड सोबत बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

चीन, व्हिएतनाम आणि मलेशियात सर्तक राहा

चीनच्या Yunnan आणि Guangxi क्षेत्रात तसेच व्हिएतनामच्या दाट जंगलात आणि मलेशियातील तिवरांच्या जंगलात मोठ्या संख्येने साप आढळतात. येथे रात्री टॉर्चचा वापर करावा, संपूर्ण अंगभर कपडे घालावे, रस्त्यावरुनच चालावे अशा सूचना दिल्या जातात.

साप चावल्यानंतर काय ?

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते बहुतांशी साप हे त्यांना धोका जाणवल्यानंतरच हल्ला करतात. यामुळे त्यांना छेडण्याचा वा त्रास देण्याचा प्रयत्न करु नये. जर साप चावला तर घाबरुन जाऊ नये. शरीर जास्त हलवू नये आणि लागलीच मेडिकलची मदत घ्यावी. घरगुती उपाय वा जखम कट करण्यासारख्या चुका महागात पडू शकतात.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत