AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : 25, 26, 27, 28 तारखेला पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात तब्बल..

Rain Update : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही अनेक ठिकाणी हवामान विभागाने मोठा इशारा दिला. मुंबईमध्ये पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली.

Rain Update : 25, 26, 27, 28 तारखेला पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात तब्बल..
Rain Update
| Updated on: Jun 25, 2026 | 7:21 AM
Share

देशभरात मॉन्सूनने दमदार हजेरी लावली. राज्यात यंदा मॉन्सूनचा पाऊस उशिराने दाखल झाला. पण सुरूवात चांगली झाली. यंदा मॉन्सूनवर एल निनोचे सावट आहे. दोन दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर 15 दिवस मॉन्सून केरळमध्ये रेंगाळताना दिसला. ज्यामुळे पेरण्या रखडल्या आणि चिंता वाढली. 22 जुलै रोजी मॉन्सूनने कोकण आणि मराठवाड्यात प्रगती केली. दुसऱ्या दिवशी कोकण आणि मराठवाडा मॉन्सूनने व्यापून टाकला. आज मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. राजस्थानपासून ते उत्तर महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. यवतमाळ, लातूर, धाराशिव, सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, नांदेड, घाटमाथा पुणे या भागात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील आठ दिवस पावसाचा जोर अशाच राहण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये आज पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आज येलो अलर्ट देत हवामान खात्याने हलक्या ते मध्यम सरींचा वर्षावाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, सध्या पावसाने विश्रांती घेतली असून कुठेही पाणी साचलेले नाही. ​ मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. सध्या जरी दिलासा असला, तरी पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मीरा-भाईंदर शहरात आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिक उकाड्याने हैराण झाले होते, मात्र या पावसामुळे संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे आडगाव परिसरातील तीन ओढ्यांना पूर, पुराचे पाणी शेतात शिरून माती खरडून गेल्याने शेतकऱ्यांच नुकसान. आडगाव, मोहखेड, गडदगव्हाण, सोरजा, टाकळखोपा या सह, 10ते 12 गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला. मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी