Soft Chapati : कनिक मळतानाच पिठात मिसळा ही गोष्ट, चपात्या मऊ, लुसलुशीत आणि फुग्यासारख्या टम्म फुगतील..
बऱ्याचदा अनेक प्रयत्न करूनही चपाती काही मऊ आणि लुसलुसीत होत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या फॉलो करून तुम्ही अगदी मऊ आणि मस्त लुसलुसीत अशी चपाती बनू शकता. फक्त काही बदल आपल्याला करावी लागतील.

बऱ्याचदा चपात्या थोड्यावेळ जरी ठेवल्या तरीही वातड होतात. वातड चपात्या कोणालाही खाण्यास आवडत नाहीत. चपाती तयार करताना अनेक बदल करूनही चपाती वातडच होते. अशावेळी पीठ मळण्याच्या पद्धतीत आणि भाजण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केला तर ज्यामुळे चपात्या या वातड होणार नाहीत. विशेष म्हणजे चपाती शिळी देखील लवकर होणार नाही. थोडे बदल आणि चपाती मऊमऊ आणि लुसलुशीत होईल. याकरिता गव्हाचे पीठ 2 कप घ्या. चवीनुसार मीठ टाका, पीठात तेलही टाका. 2 ते 3 चमचे तेल टाका. त्यात पाणी अंदाजे 1 कप ते 1.5 कप टाका. तुम्हाला चपात्या मऊ हव्या असतील तर सर्वात अगोदर भांड्यात पीठ आणि मीठ टाका. बऱ्याचदा आपल्याकडून चूक होते की, आपण पाणी एकदाच टाकतो. कायम लक्षात ठेवा की, पाणी थोडे थोडे टाका. पीठ चांगले मळण्यासाठी 7 ते 8 मिनिटे पीठ मळून घ्या.
हे लक्षात घ्या की, पीठ मऊ झाले पाहिजे. पीठ कडक अजिबात नको. त्यानंतर 3 ते 4 मिनिटे तेल टाकून पुन्हा पीठ चांगले मळून घ्या. हे सर्व झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटे पीठ चांगले झाकून ठेवा. दोन्ही हातांना थोडेसे तेल लावून घ्या आणि पोळ्यांकरिता गोळे तयार करा. पीठ लावून हळूहळू लाटून घ्या. त्यानंतर पुरी एवढी चपाती झाली की, त्याला तेल लावा आणि त्याचा पेढा तयार करा. त्यानंतर काटाने लाटा.
मध्यभागी कधीच जास्त चपाती लाटू नका. चपात्या व्यवस्थित होण्यासाठी ही खूप जास्त चांगली पद्धत आहे. तव्यावर चपाती टाकताना तवा फार जास्त गरम नसावा. मध्य आचेवर चपाती शेकून घ्या. त्यानंतर फार वेळा चपाती पलटण्याच्या भानगडीत पडू नका. जास्त चपाती पलटली की, ती फुगत नाही. 11 सेकंद चपातीला भाजू द्या.
दोन्ही बाजूने चपाती छान भाजूद्या. जर तुम्हाला तेल लावायचे तर तुम्ही तेल लाऊ शकता. जर तुम्हाला तेल लावायचे नसेल तर तेल नका लावू. एकदम मंद आचेवर चपात्या भाजू नका. जे लोक डाएट करतात, त्यांनी तेल लावू नये. हॉट बॉक्समध्ये चपाती ठेवताना झाकण पूर्ण बंद करू नका. त्यामुळे चपातीला पाणी सुटू शकते.