
Alcohol Effect on Women: दारुचे सेवन हे शरिरासाठी हानीकारक मानल्या जाते. तरीही पुरुषच नाही तर स्त्रीया सुद्धा दारु पितात. पण अनेक संशोधनातून हे समोर आले की पुरुषांपेक्षा महिलांना दारु लवकर चढते. दारुचा अंमल स्त्रीयांना लवकर होतो. यामागे सहनशक्ती अथवा शारिरीक कमकुवता पणा अशी काही कारणं तुम्हाला वाटत असतील ते काही खरं नाही. तर शरीराची रचना, वजन आणि चयपचय क्रिया याच्याशी त्याचा थेट संबंध आहे. त्यामुळे दारु पिताच महिलांवर त्याचा अंमल दिसून येतो. सम प्रमाणात दारू पिल्यावर पुरुषांपेक्षा स्त्रीयांवर दारूचा अंमल वाढलेला दिसतो.
हे पण महत्त्वाचे कारण
दारुचे विघटन करणारे एंजाईम्स महिलांच्या शरीरात कमी सक्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या रक्त प्रवाहात थेट दारू पोहचते. शरिरासोबतच मेंदूवर पण या दारुचा लवकर परिणाम दिसून येतो. दारुचा महिलांवरील अंमल हा पुरुषांपेक्षा अधिक खोल आणि प्रदीर्घ काळ टिकतो. त्यामुळे महिलांना दारु पिल्यावर गरगरणे, डोके जड पडणे, दिवसभर सुस्तावल्यासारखं वाटण्याचे प्रकार घडतात.
संशोधनानुसार, महिलांच्या शरीरात दारुचे विघटन करणारे एंजाइम्स पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कमी सक्रिय असतात. त्यामुळे दारुचा मोठा हिस्सा थेट त्यांच्या रक्तात पोहचतो. त्यामुळे थोड्या मात्रेत जरी दारु पिली तरी महिलांना लवकर नशा होते. त्यांचा त्यांच्यावरील ताबा सुटतो आणि मग त्या असंबंध बडबड करणे अथवा गोंधळ घालण्याचा प्रकार करतात.
शरीराचा आकार आणि वजन
शरीराराचा आकार आणि वजन यावरही दारुचा परिणाम अवलंबून असतो.महिलांचे शरीर हे पुरुषांपेक्षा लहान आणि त्यामानाने हलके असते. त्यामुळे एकाच मात्रेत दारू पिल्यावर महिलांवर त्याचा झटपट परिणाम दिसून येतो. महिलांवर दारुचा अंमल लवकर चढतो. त्यांच्या रक्तात दारु थेट पोहचत असल्याने त्यांच्यावर दारुचा खोलवर आणि दीर्घकाळ परिणाम दिसून येतो.
डोक्यावर मोठा परिणाम
दारुचा परिणाम केवळ शरीरापर्यंत मर्यादीत नसतो. तर दारुचा परिणाम हा मेंदूवर पण होतो. नवीन संशोधनानुसार, महिलांची न्युरोलॉजिकल सिस्टिम दारुवर पुरुषांच्या तुलनेत लवकर प्रतिक्रिया देते. त्यामुळे महिलांना दारुचा अंमल लवकर चढतो आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागते अथवा त्यांचा मनावरील ताबा लवकर सुटतो. दारुचा मोठा पेग घेतल्यावर महिलांचा गोंधळ उडतो. त्यांना मग सूचत नाही. निर्णय क्षमता धोका देते आणि अनेकदा त्यांचा मनावरील ताबा सुटतो, त्या गोंधळ घालतात.