
Powerfull Army : अमेरिकेचे सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. अमेरिकेनंतर रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. जगभरातील कोणत्या देशाचे सैन्य किती मजबूत आहे याविषयी 2024 ची मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भूतान हा देश शेवटच्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 9व्या स्थानावर आहे. लष्करी शक्ती समजून घेताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. त्यामुळे नुसती सैन्याची संख्या जास्त असून चालत नाही. त्यांच्याकडे किती आधुनिक हत्यारे आहेत. सैन्य किती चपळ आहे याचा देखील अभ्यास केला जातो.
भारतीय लष्कराबद्दल बोलायचे झाले तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतीय लष्कर चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय सैन्य जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. भारतानंतर दक्षिण कोरिया पाचव्या स्थानावर आहे. युनायटेड किंडम सहाव्या स्थानावर आहे.
145 देशांतील सैन्य आणि त्यांच्याकडे असलेली हत्यारे यावर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये सैन्यांची संख्या, लष्करी उपकरणे, आर्थिक स्थैर्य, भौगोलिक स्थान आणि उपलब्ध संसाधने अशा 60 हून अधिक घटकांचा विचार करण्यात आला आहे. हे घटक एकत्रितपणे PowerIndex स्कोअर निर्धारित करतात, जेथे कमी स्कोअर मजबूत लष्करी क्षमता दर्शवतात.
ग्लोबल फायरपॉवरने ही यादी जाहीर केली आहे. यानंतर त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, अधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत देशांना मोठ्या आणि कमी विकसित शक्तींशी स्पर्धा करू देतो.
जगातील मोठ्या देशांची आर्थिक ताकद, लष्करासाठी असलेले बजेट याचा देखील समावेश करण्यात आला आहे. या अहवालात जगातील 145 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रत्येक देशाची परिस्थिती पुढे कशी बदलत गेली याचा देखील अभ्यास यात करण्यात आला आहे.
अमेरिका
रशिया
चीन
भारत
दक्षिण कोरिया
युनायटेड किंगडम
जपान
तुर्की
पाकिस्तान
इटली
भूतान
मोल्डोव्हा
सुरीनाम
सोमालिया
बेनिन
लायबेरिया
बेलीज
सिएरा लिओन
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
आइसलँड