
जगात सोन्याचे दर आकाशाला भिडले असताना चीनमधून एक अशी बातमी आली आहे ज्याकडे जागतिक खनिज आणि कमोडिटी मार्केटचे लक्ष खेचले गेले आहे. चीनने पहिल्यांदा समुद्राखाली सोन्याच्या साठ्याचा शोध लावला आहे. हा शोध केवळ चीनसाठीच ऐतिहासिक नसून आतापर्यंत आशियात समुद्रात सापडलेली सर्वात मोठी गोल्ड डिस्कव्हरी आहे. हा संकेत आहे की चीन येत्या काही वर्षात सोने आणि इतर महत्वाच्या खनिजांसंदर्भात जास्त आक्रमक रणनिती स्वीकारणार आहे.
Mynews च्या रिपोर्टच्या मते हे गोल्ड डिपॉझिट चीनच्या शानडोंग प्रांताच्या यानताई शहराच्या जवळ आहे.लाईझोऊ किनाऱ्याच्या खाली हा खजाना सापडला आहे. स्थानिय प्रशासनाच्या मते या शोधानंतर लाईझोऊमध्ये आता एकूण प्रमाणित सोन्याचा साठा ३,९०० टनाहून जास्त झाला आहे. हा चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्याच्या २६ टक्के आहे. त्यामुळे लाईझोऊ चीनमधील सर्वात जास्त गोल्ड रिझर्व्ह आणि गोल्ड प्रोडक्शनचा इलाका बनला आहे. मात्र, समुद्राच्याखाली सापडलेल्या या सोन्याच्या साठ्याचा वास्तविक आकार किती आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही.
सोन्याचा साठा सापडण्याची ही एकमेव घटना नसून अलिकडे चीनमध्ये सोन्याचे अनेक मोठे साठे शोधण्यात आले आहे. गेल्या महिन्यात चीनने लियाओनिंग प्रांतात १,४४४ टनाहून अधिक जास्त सुपरगोल्ड डिपॉझिट्स सापडल्याची घोषणा केली होती. ही साल १९४९ नंतरची सर्वात मोठी सिंगल डिस्कव्हरी सांगितली आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये शिनजियांगच्या जवळ कुनलुन पर्वताच्या क्षेत्रात देखील १००० टनाहून अधिक सोन्याच्या साठ्याचा अंदाज लावला होता.
शानडोंह प्रांत आधीपासूनचे चीनच्या गोल्ड मॅपमध्ये महत्वाची भूमिका निभावत आहे. येथे जियाओडोंग बेटावर जगातील तिसरा सर्वात मोठा गोल्ड मायनिंग बेल्टपैकी एक आहे.
चीन जगातील सर्वात मोठा गोल्ड उत्पादक आहे. China Gold Association नुसार गेल्यावर्षी चीनने ३७७ टन सोन्याचे उत्पादन केले होते. तरीही प्रमाणित गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत चीन आताही दक्षिण आफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि रशिया सारख्या देशांच्या मागे आहे. नवीन संशोधनाने हे अंतर हळूहळू कमी होऊ शकते.
सोने केवळ गुंतवणूक किंवा चलन संकटातून वाचण्याचा मार्ग नसून याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स, एअरोस्पेस आणि हाय-टेक इंडस्ट्रीत देखील होतो. त्याचमुळे चीन याला धोरणात्मक संसाधन मानत आहे.
चीन खनिज शोधांसाठी आर्टीफिशियल इंटेलिजन्स, एडव्हान्स ग्राऊंड- पेनेट्रेटिंग रडार आणि सॅटेलाईट तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु केला आहे. याचा परिणाम केवळ सोन्यापर्यंत मर्यादित नाही. अलिकडे शोधलेले नवे खनिज “जिनशिऊइट” ला International Mineralogical Association ने मान्यता दिलेली आहे. हे खनिज बॅटरी, केमिकल आणि एअरोस्पेस सेक्टरसाठी महत्वाचा धातूंशी जोडलेले आहे.