बांगलादेशच्या सैन्यात हिंदूंची भरती होते का ? आता एकूण किती हिंदू सैनिक आहेत ?
आपला शेजारील देश बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार असल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. मात्र बांगलादेशाच्या सैन्यात हिंदूंना प्रवेश असतो का असा सवाल केला जात आहे. काय आहे याचे उत्तर पाहा....

Bangladesh Crisis: आपला शेजारील देश बांगलादेशात सध्या राजकीय अस्थिरता आणि सामाजिक तणाव सुरु आहे. पंतप्रधान शेख हसीना यांना हटवल्यानंतर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ शासनातीलच नव्हे तर राज्याच्या अन्य संस्थांतील अल्पसंख्याकांची काय स्थिती आहे ? यावर सवाल केले जात आहेत. या दरम्यान, एक प्रश्न निर्माण होतो आहे की बांगलादेशाच्या सैन्यात हिंदू सैनिक सामील होऊ शकतात का ? चला पाहूयात काय आहे स्थिती
सैन्यात समावेश होण्यासाठी धर्माचा अडसर आहे का ?
कायद्यानुसार आणि अधिकृतपणे धर्म बांगलादेशाच्या सैन्याक सामील होण्यासाठी कोणतीही बाधा आणत नाही. बांगलादेशाचे भरतीचे नियम आणि घटनात्मक ढाच्यात कोणताही नागरिक मग तो हिंदू असो मुस्लीम असो की बौद्ध वा ख्रिश्चन तो सैनिक आणि अधिकारी दोन्ही पदांसाठी अर्ज करु शकतो. निवड प्रक्रिया राष्ट्रीयता, वय, शिक्षण, शारीरिक फिटनेस आणि मेडीकल मानकांवर आधारित असते ती धर्माच्या आधारे केली जात नसते.
भरती नियम आणि पात्रता मानदंड
बांगलादेशातील सैन्यात सामील होण्यासाठी उमेदवार जन्माने बांगलादेशाचा नागरिक असणे गरजेचे असते. कमिशन अधिकारी पदांसाठी उमेदवाराला अर्ज करताना अविवाहित असणे गरजेचे असते. याच बरोबर आवश्यक शैक्षणिक मानदंडांना पूर्ण करणे गरजेचे असते. एवढेच नाही तर सैनिक स्तरावरील भरतीसाठी सामान्य वयोमर्यादा सर्वसाधारणपणे १७ ते २० वयादरम्यान ठेवलेली आहे. पारदर्शकतेच्या कमतरतेने योग्य संख्येपर्यंत पोहचणे कठीण आहे.
सध्या सैन्यात हिंदू सैनिक किती ?
बांगलादेशाचे लष्कर त्यांच्या कर्मचाऱ्यांचा डाटा प्रकाशित करत नाही. त्यामुळे असा कोणताही अधिकृत आकडा नाही ज्यात किती हिंदू अधिकारी तेथील सैन्यात कार्यरत आहेत. २०२२ च्या जनगणनेच्या मते बांगलादेशाच्या लोकसंख्येत हिंदूंची संख्या सुमारे ७.९ ते ८ टक्के होती. अनौपचारिक अंदाजानुसार बांगलादेशाच्या सैन्यात हिंदूंचे प्रतिनिधीत्व सुमारे ३ ते ४ टक्के असू शकते. बांगलादेशी सैन्याचे दरवाजे हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकासाठी खुले असतात. संविधानिक रुपाने येथे कोणतेही भेदभाव नाहीत. मात्र, कमी भागीदारी, पब्लिक डेटाची कमतरता आणि सध्याच्या नाजूक राजकीय वातावरणाने संशयाला जीवंत ठेवलेले आहे.मात्र, हिंदू सैन्यात काम करु शकतात आणि करतही आहेत. मात्र त्यांची संख्या खूपच कमी आहे.
