AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey : हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा – राज ठाकरे यांचे मोहन भागवतांवर टीकास्त्र

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषाविषयक विधानावर राज ठाकरे यांनी तीव्र टीका केली आहे. भाषिक आणि प्रादेशिक अस्मितांना 'आजार' म्हणणे चुकीचे असून, ही देशाची ओळख आहे, असे राज ठाकरे म्हणाले. संघाला अप्रत्यक्ष राजकीय भूमिका टाळण्याचा सल्ला देत, हिंदी लादणाऱ्या सरकारला प्रश्न विचारण्याचे आव्हानही त्यांनी केले. मोदींच्या भीतीमुळेच लोक कार्यक्रमाला आले, असा आरोपही त्यांनी केला.

Raj Thackrey : हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा - राज ठाकरे यांचे मोहन भागवतांवर टीकास्त्र
राज ठाकरे यांची मोहन भागवतांवर टीकाImage Credit source: social media
| Updated on: Feb 10, 2026 | 10:06 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारोहानिमित्तच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे भाषेच्या आधारावर वाद करणे म्हणजे स्थानिक आजार असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती. त्यांच्या या विधानामुळे बरीच खळबळ माजली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोहन भागवतांवर जोरदार टीका केली आहे. मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! असं राज ठाकरे यांनी त्यांना सुनावलं. तसंच अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भागवतांवर टीकास्त्र सोडलं.

राज ठाकरे यांची पोस्ट काय ?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचं ट्विटर) एक लांबलचक पोस्ट राज ठाकरे यांनी लिहीली आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील ! असंही त्यात नमूद केलं आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी..

8 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !

असो . . .

मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो !

भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.

दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे.

ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?

मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?

संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.

आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.

या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी