कधी काळी बांगलादेशाच्याही मागे होता चीन, आज कसा बनला सुपरपॉवर ? कसा घडला आर्थिक चमत्कार ?
आपला शेजारी चीन कधी काळी रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्टरच्या बाबतीत भारताच्या खूप मागे होता. आज चीनमध्ये बुलेट ट्रेनपासून सर्वात जलद धावणारी मॅगलेव्ह ट्रेन आहे. चीन हा जगातील अमेरिकेनंतर जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे.

एकेकाळी चीन जगातील सर्वात गरीब देशाच्या यादीत सामील होता. चीनकडे पुरेसे धान्य उपलब्ध नव्हते. तंत्रज्ञानात चीनही मागे होता. उद्योगधंदे नव्हते. आणि अर्थव्यवस्था सरकारच्या ताब्यात जखडली होती. तेव्हा चीनची स्थिती भारतच नव्हे तर बांगलादेशापेक्षाही वाईट होती. परंतू नंतर एक असा काळ आला की चीनचे नशीब कायमचे बदलले.
१९७८ मध्ये चीनचे दरडोई GDP सुमारे १५५ डॉलर होती. जी बांगलादेश, चाड आणि मलावी सारख्या देशांपेक्षा कमी होती. तर मॅक्रोट्रेंड्स आणि स्टॅटिस्टीक्सटाईस्म.कॉमच्या डेटानुसार बांगलादेशाचा दरडोई GDP सुमारे १७६ डॉलर होता, तेव्हा तेथील आर्थिक विकास दर ७ टक्क्यांहून जास्त होता.
माओच्या काळातील अडचणी आणि निराशा
१९४९ नंतर चीनवर माओ त्से तुंगचे शासन होते. कम्युनिस्ट विचारधारा सर्वोच्च होती. शेतीपासून फॅक्टरीपर्यंत सरकारचे आदेश चालत होते. माओ यांचा ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ प्रयोग देशाला पुढे नेण्या ऐवजी मागे घेऊन गेला. चुकीची धोरणांमुळे लाखो लोक भूकेने मेले, आर्थिक विकास ठप्प झाला. लोकांचे जीवन केवळ दोन वेळच्या जेवणापुरते मर्यादित होते. जगाशी व्यापार जवळपास संपला होता. परदेशी कंपन्या चीनमध्ये पाऊल ठेवू शकत नव्हत्या.
श्याओपिंग यांनी दिशा बदलली
१९७६ मध्ये माओ यांच्या मृत्यूनंतर १९७८ मध्ये चीनचे नेतृत्व दुरदर्शी नेते डेंग श्याओपिंग यांच्या हाती गेले. ते कम्युनिस्ट असले तरी त्यांचा दृष्टीकोन व्यावहारिक होता. त्यांनी एक वक्तव्य केले होते की मांजर काळी असो वा पांढरी तिने केवळ उंदीर पकडले पाहिजे. याचा अर्थ आता विचारधारा नव्हे तर निकाल महत्वाचे होते. नंतर डेंग यांनी निर्णय घेतला चीनची द्वारे जगासाठी उघडी करण्याचा…
कृषीमध्ये सुधारणा, विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल
डेंग यांचे पहिले मोठे पाऊल कृषी सुधारणा होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर आंशिक स्वातंत्र्य देत सरकारला ठराविक हिस्सा दिल्यानंतर ते पिके बाजारात विकू शकत होते. यामुळे शेतकऱ्यांची मेहनतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. धान्य उत्पादन वेगाने वाढले आणि चीन उपासमारीच्या संकटातून बाहेर आला.
SEZ – ने सुरु झाला आर्थिक चमत्कार
डेंग यांनी चीनच्या दक्षिण भागातील काही क्षेत्रांना स्पेशल इकॉनॉमिक झोन ( SEZ ) घोषीत केले. शेनझेन सारख्या छोट्या गावांना प्रयोगशाळा बनवले. जेथे विदेशी गुंतवणूक, खाजगी कंपन्या आणि बाजाराचे नियम लागू झाले. विदेशी कंपन्याना करात सूट मिळाली. जमीन स्वस्तात दिली गेली आणि सरकारने प्रत्येक प्रकारची सुविधा दिली.
SEZ बनला चिनी अर्थव्यवस्थेचा कणा
चीनची सर्वात मोठी ताकद त्याची मोठी लोकसंख्या आणि कमी मजूरी दर होती. विदेशी कंपन्या जे साहित्य अमेरिकेत २३ डॉलरमध्ये तयार करत होत्या. त्या चीनमध्ये १० डॉलरमध्ये तयार होत होत्या. त्यामुळे कंपन्या आल्या त्यांनी फॅक्टरी लावल्या जगातल सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आले. चीनने हे तंत्रज्ञान केवळ आत्मसातच केले नाही तर त्यात सुधारणा करुन आणखी चांगले केले. नंतर ९० च्या दशकात चीन टेक्सटाईल, बुट, खेळण्यापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि हायटेक उत्पादनांचा हब झाला.
चीन बनला WTO चा सदस्य
२००१ मध्ये चीन जेव्हा WTOचा सदस्य बनला. तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दरवाजा संपूर्ण खुला झाला. जगातील मोठे ब्रँड त्यांची सप्लाय चेन चीनमध्ये आणू लागले. सरकारने रस्ते, बंदरे, आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. वेगवान निर्णय, स्वस्त मजूरी आणि मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरने चीनला जागतिक स्तरावर अनबिटेबल बनवले.
आजचा चीन – फॅक्ट्रीपासून इनोव्हेशन हब
आज चीन जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक जीडीपीच्या सुमारे १८ टक्के योगदान एकट्या चीनचे आहे. शेनझेन कधी काळी एक गाव होते. ते आता टेक्नॉलॉजी हब बनून सिलीकॉन व्हॅली आव्हान देत आहे. हुवावे, अलीबाबा, टेन्सेंट सारख्या कंपन्या जगातील दिग्गज कंपन्यात सामील आहेत.
