AC ची एक्सपायरी डेट काय असते? 99% लोकांना नसतं माहीत

एसीची आयुष्यमान साधारणपणे 10 ते 15 वर्षे असते, पण योग्य देखभाल आणि वापराने हे आयुष्यमान वाढवता येते. नियमित फिल्टर आणि कॉइलची स्वच्छता, स्थिर व्होल्टेज पुरवठा, आणि योग्य वापर एसीचे आयुष्यमान वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. जास्त तापमान, आर्द्रता आणि धूळ यामुळेही एसीची कार्यक्षमता कमी होते.

AC ची एक्सपायरी डेट काय असते? 99% लोकांना नसतं माहीत
Air Conditioners
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 26, 2025 | 1:53 PM

ज्या प्रकारे खाण्यापिण्याचे पदार्थ, औषधांची एक्सपायरी डेट असते. तशीच ACची सुद्धा एक्सपायरी डेट असते. एसीची एक्सपायरी डेट असते हे ऐकून अनेकांच्या कानाचे केस ताठ होतील. भुवया उंचावल्या जातील. कारण 99 टक्के लोकांना ACची एक्सपायरी डेट असते हेच माहीत नसतं. त्यामुळेच एसी किती वर्ष चालते आणि किती वर्ष तिचा वापर केला पाहिजे याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

क्रोमाच्या ऑफिशियल वेबसाईटच्या नुसार, एसीचं वय (एक्सपायरी डेट) 10 ते 15 वर्ष आहे. पण तुम्ही एअर कंडिशनरचा योग्य पद्धतीने वापर केला, त्याची देखभाल ठेवली तर 15 वर्षापर्यंत तुम्ही एसी आरामशीर वापरू शकता. पण एसी लवकर एक्सपायर होण्यासाठीची अनेक कारणंही आहेत. ही कारणं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. नाही तर तुम्हाला वारंवार एसी घ्यावी लागू शकते. त्यात तुमचा पैसाही जातो आणि मनस्तापही होतो. त्यामुळे एसीची देखभाल करणं हा एसी अधिक काळ टिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

या कारणामुळे ACचं वय होतं कमी

मेंटेनन्स : जर तुम्ही एसीची योग्य देखभाल केली तर एसी 10 वर्षापर्यंत आरामशीर चालतो. पण त्यासाठी तुम्हाला नियमितपणे फिल्टरची सफाई करावी लागेल. केवळ फिल्टरच नव्हे तर कॉइलची भी क्लिनिंग करण्याची गरज आहे. फिल्टर आणि कॉइलच्या क्लिनिंगने एसीची लाइफ वाढू शकते. पण तुम्ही जर एसी घाण ठेवली तर त्याची एक्सपायरी डेट जवळ आलीच म्हणून समजा.

पॉवर सप्लाय : एसीची लाइफ कमी करण्याच्या मागे व्हॉल्टेज फ्लक्च्युएशन आणि इलेक्ट्रिकल इश्यू महत्त्वाचे आहेत. कारण या दोन्ही गोष्टी एसीच्या पार्ट्सला डॅमेज करतात आणि एसीची लाइफ कमी करतात.

ही सुद्धा कारणं : अधिक टेंपरेचर, ह्युमिडिटी आणि डस्ट-डर्ट तसेच प्रदूषित वातावरण यामुळेही एसीच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. त्यामुळे एसीची लाइफ कमी होते. जर तुम्हाला एसीची लाइफ वाढवायची असेल तर कमीत कमी चार महिन्यात एक वेळा सर्व्हिस केली पाहिजे. एसीतील धूळ-माती साफ होऊन एसी अत्यंत चांगला चालला पाहिजे.

वापर : जर तुम्ही एसीला ब्रेक न देता सलग चालू ठेवला तर त्याचाही परिणाम एसीच्या लाइफवर होतो. त्यामुळे एसीची लाइफ कमी होते.