e-Aadhaar App लाँच, आधार अपडेट करणे सोपे; लवकरच येणार QR कोड सिस्टीम

लवकरच एक नवीन ई-आधार प्रणाली सुरू होणार आहे. यामध्ये क्यूआर कोडच्या मदतीने आधारचे व्हेरीफिकेशन करणे सोपे होणार आहे. त्यामुळे आता केवळ बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आता आधार सेंटरला जावे लागणार आहे.

e-Aadhaar App लाँच, आधार अपडेट करणे सोपे; लवकरच येणार QR कोड सिस्टीम
now Aadhar update easy
| Updated on: Jul 29, 2025 | 8:42 PM

e-Aadhaar : UIDAI लवकरच एक नवा ई-आधार सिस्टीम लाँच करणार आहे. यात QR कोडच्या मदतीने आधार व्हेरीफिकेशन होणार आहे. आता आधारची फोटोकॉपी जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. ही नवीन सिस्टीम २०२५ च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात सुरु होणार आहे. नवीन आधार अपडेट एपमुळे लोकांना आता घरबसल्या आपली माहिती बदलण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर यासारखी माहीती सहजपणे अपडेट करता येणार आहे.

UIDAI चे CEO भुवनेश कुमार यांनी सांगितले की सुमारे २००० मशिन्स या नव्या सिस्टीममध्ये परिवर्तित केली जाणार आहे. नोव्हेंबरपासून तुम्हाला केवळ बायोमेट्रीक व्हेरीफिकेशन ( उदा. फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅनिंग ) साठी आधार सेंटरला जावे लागणार आहे. या नव्या पद्धतीने कागदोपत्री कारवाई टाळली जाऊन वेळ वाचणार आणि घोटाळ्याचा प्रकारांवर अंकुश येणार आहे.

सरकारी दस्ताऐवजामुळे माहीती मिळेल

आता आधार अपडेटसाठी तुमची माहिती आता थेट सरकारी डेटाबेसमधून घेतली जाणार आहे. यात जन्मप्रमाणपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशन कार्ड आणि मनरेगा रिकॉर्डचा समावेश आहे. याशिवाय वीजबिलालाही पत्त्याच्या व्हेरीफिकेशनसाठी जोडण्याची योजना आहे. याचा आधार अपडेट करणे आणखी सोपे होणार आहे. ही नवीन सिस्टीम आधारला आणखीन सुरक्षित, वेगवान आणि युजर फ्रेंडली बनवणार आहे. २०२५ च्या अखेरपर्यंत ही यंत्रणा संपूर्ण देशात लागू होणार आहे. ज्यामुळे आधारकार्डशी जोडण्याचे काम आणखी सोपे होणार आहे.

मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट

UIDAI आता लहान मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटवर लक्ष देत आहे. ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षांच्या वयात बायोमेट्रीक अपडेट करणे गरजेचे असते. यासाठी CBSE सारख्या बोर्ड शाळांमध्ये बायोमेट्रीक कँप लावण्याची तयारी सुरु आहे,म्हणजे लहान मुलांचे अपडेट करणे सोपे होईल. नव्या QR कोड सिस्टीममुळे बनावट दस्ताऐवज वापर कमी होण्यास मदत होणार आहे. ही सिस्टीम रजिस्टार ऑफीस आणि हॉटेस सारख्या जागांवर टेस्ट केली जाणार आहे. ही यंत्रणा सुरक्षित असून तुमच्या परवानगी शिवाय कोणालाही शेअर केली जाणार नाही.

का खास आहे ही सिस्टीम ?

कागदोपत्री काम कमी होईल.

आधार अपडेट वेगवान आणि सोपे होईल.

बनावट कागदपत्रांचा वापर कमी होईल.

घरातूनच जास्त माहिती अपडेट करु शकणार