डिमार्टमध्ये जाताना ही युक्ती करा आणि वाचवा बक्कळ पैसे, मोठी बचतसोबतच पिशवीही..
डिमार्टमध्ये आपण कधीही गेलो तरीही ग्राहकांची मोठी गर्दी असते. या गर्दीमध्ये आपल्याला नक्की कोणत्या वस्तूंवर ऑफर सुरू आहेत, हे देखील कळत नाही. ऑगस्ट महिन्यात काही दिवस डिमार्टमधील खरेदीसाठी अत्यंत उत्तम आहेत. हे दिवस नक्की कोणते हे जाणून घ्या.

डिमार्टमध्ये खरेदीकरिता जाण्याचे फायदेच फायदे आहेत. कोणता एक फायदा नसून पैशांची, वेळेचीही मोठी बचत होते. शिवाय एकदाच घरात लागणारे प्रत्येक साहित्यही मिळते. वारंवार हे आणायला ते आणायला जाण्याची गरजच राहत नाही. लहान मुलांनाही डिमार्टमध्ये जायला आवडते. बऱ्यापैकी लोक एकदाच डिमार्टला जातात आणि महिनाभराचा किराणा खरेदी करतात. एका वर एक फ्री वस्तू मिळतात. डिमार्टकडून प्रत्येक महिन्याला वस्तूंवर मोठी सवलत दिली जाते. मात्र, आपल्यापैकी 90 टक्के लोकांना हेच माहिती नसते की, नक्की ही सवलत कधी आणि कोणत्या दिवशी असते. मग काय ज्या दिवशी पाहिजे, तेवढी सवलत नसते आणि आपण डिमार्टमध्ये खरेदीसाठी जातो. मग आपल्याला मोठी सवलत मिळत नाही. डिमार्टमध्ये विशिष्टवेळी प्रत्येक गोष्टीवर सवलत असते. एखादा सण असला की, आपण डिमार्टमध्ये खरेदीसाठी जातो. मात्र, त्यावेळी खूप जास्त गर्दी असते.
ऑगस्ट महिन्यात डिमार्टमध्ये खरेदीकरिता नक्की कधी जावे? जेणे करून तुम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तूंवर ऑफर मिळेल, हे जाणून घेऊयात. ऑगस्ट महिन्यात मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी डिमार्टमध्चे जा. कारण आठवड्याच्या शेवटी ग्राहकांची संख्या कमी असते. त्यामध्येच सकाळी लवकर म्हणजे 12 ते 4 च्या दरम्यान तुम्ही डिमार्टमध्ये जात असाल तर अधिक फायदेशीर ठरेल.
कारण दुपारनंतर गर्दी वाढते. वाढलेल्या गर्दीमुळे नक्की कोणत्या वस्तूंवर ऑफर दिली जात आहे, हेच आपल्या लक्षात येत नाही. यामुळे तुम्हाला डिमार्टमध्ये कमी पैशात जास्त वस्तूंची खरेदी करायची असेल तर डिमार्टमध्ये शक्यतो 12 ते 4 यादरम्यान गेले पाहिजे. यादरम्यान तुम्ही अधिक वेळ आणि सोयीस्कर खरेदी करू शकता.
शनिवार आणि रविवारी कुटुंबासोबत येणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असते, त्यामुळे तुम्हाला बिलिंग काउंटरवर जास्त वेळ थांबावे लागू शकते. यासोबतच गर्दी इतकी जास्त असते की, काय घ्यावे आणि काय नाही हेच कळत नाही. गर्दीमध्ये आपल्याला जे काही मिळेल, ते घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपला निर्णय फसतो. जर तुम्ही ही युक्ती केली तर मोठ्या पैशांची बचत होईल आणि तुमची पिशवीही भरेल किराणाने..