AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपात्रतेच्या निकालापूर्वीच… कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; थेट निवडणूक आयोगालाच धरलं धारेवर

Shiv Sena Symbol Case : शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आजही युक्तिवाद केला. त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरल्याचे समोर आले आहे.

अपात्रतेच्या निकालापूर्वीच... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; थेट निवडणूक आयोगालाच धरलं धारेवर
Kapil Sibbal on Shivsena CaseImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 06, 2026 | 3:56 PM
Share

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत सुनावणी सुरू आहे. काल शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. आज या सुनावणीचा दुसरा दिवस आहे. आजही सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केला आहे. आजच्या युक्तिवादात सिब्बल यांनी थेट निवडणुक आयोगालाच धारेवर धरलं आहे. निवडणूक आयोगाने शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे चिन्ह दिलं असा युक्तिवाद केला आहे. सिब्बल यांनी कोर्टात नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

अपात्रतेच्या निकालापूर्वीच निवडणूक आयोगाने…

कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ‘माननीय न्यायमूर्तींनो, मी हे काहीशा संकोचाने मांडत आहे. अपात्रतेचा प्रश्न निकाली निघण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने कोणता गट हा मूळ राजकीय पक्ष आहे, याचा निर्णय दिला, तर नेमकी हीच समस्या निर्माण होते. एकदा आयोगाने एखाद्या गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देऊन त्याला पक्षाचे निवडणूक चिन्ह बहाल केले, तर त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय झाला तरी त्याचा काहीच उपयोग राहत नाही; तोपर्यंत “घोडा तबेल्यातून निघून गेलेला असतो.”

पुढे बोलताना सिब्बल यांनी म्हटले की, ‘मी हाच युक्तिवाद घटनापीठासमोरही मांडला होता. अपात्रतेच्या कार्यवाहीचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने प्रतीक्षा करावी, अशी माझी विनंती होती. मात्र, स्पष्टपणे सांगतो की, पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा युक्तिवाद स्वीकारला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाच्या वादावर निर्णय दिला. अपात्रतेच्या कार्यवाहीतील प्रत्युत्तरे 2023 मध्ये दाखल झाली; तोपर्यंत आयोगाने सर्व निर्णय आधीच दिले होते आणि त्यामुळे आज आम्ही या परिस्थितीत आहोत.’

पुढे बोलताना सिब्बल यांनी म्हटले की, ‘विधिमंडळ पक्ष फुटला म्हणून राजकीय पक्ष फुटला असं होतं नाही. संघटनास्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं’ हेही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. सिब्बल यांनी केरळ कोर्टाच्या एका निकालाचा दाखला दिला. तसेच इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी केसचा दाखला देखील सिब्बल यांनी दिला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल