AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या हॉटेलच्या वेटरची टीपमधूनच छप्परफाड कमाई, कमावतात किती?

Five-Seven Star Hotel Waiters: देशातील पंचतारांकित हॉटेलमधील वेटर, खानसामा आणि इतरांचा पगाराचा आकडा अनेकांना थक्क करणारा असतो. तर काही ग्राहक उत्तमे सेवेबद्दल वेटरला खास टीप सुद्धा देतात. किती होते त्यांची कमाई? काय आहे आर्थिक गणित?

बड्या हॉटेलच्या वेटरची टीपमधूनच छप्परफाड कमाई, कमावतात किती?
बड्या हॉटेलच्या वेटरची टीपमधूनच छप्परफाड कमाई
| Updated on: Sep 18, 2026 | 3:00 PM
Share

आलिशान हॉटेलमधील आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्तम सेवा मिळते. येथील वेटर ही नीटनेटके, हायफाय इंग्रजी बोलणारे असतात. त्यांच्या पगाराचा आकडा अनेकांना चक्रावून टाकतो. पण त्यापेक्षा त्यांच्या कमाईचे अजून एक गणित असते. अर्थात प्रत्येक सेव्हन स्टार, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये टीप दिल्या अथवा घेतल्या जाते असे नाही. पण उत्तम सेवेबद्दल ग्राहक वेटरला टीप देण्याची परंपरा आहे. लक्झरी हॉटेल्सच्या टीपमधून काहींची जबरदस्त कमाई होते. आदरातिथ्याबद्दल ग्राहक खूष होऊन टीप देतो. ती घेणे अथवा न घेणे हे वेटरवर अवलंबून असते. पण ग्राहकांचा मान ही राखावा लागतो. हॉस्पिटिलीटी क्षेत्रात टीप ही परंपरा अनेक जण जपतात.

वेतनापेक्षा टीपमधून अधिक कमाई

पंचतारांकित अथवा आलिशान हॉटेलमध्ये एकदम चुणचुणीत लोक काम करतात. मुलं-मुली वेटर म्हणून आटोपशीर काम करतात. त्यांचे वेतन हे 20 ते 35 हजारांच्या घरात असू शकते. तर बड्या हॉटेल्समध्ये श्रीमंत ग्राहक येतात. त्यात उद्योजक, सेलिब्रिटी आणि परदेशी पर्यटकांचा भरणा अधिक असतो. ते थकवा घालवण्यासाठी अथवा मूड फ्रेश होण्यासाठी हॉटेलमध्ये थांबतात. अशावेळी वेटरची तत्परता आणि चांगली सेवा या आधारे काही जण त्यांना टीप देतात. टीपच्या रक्कमेतून वेटरची अधिक कमाई होते असा दावा करण्यात येतो.

महिनाभरात किती होते कमाई?

पंचतारांकित हॉटेल्समधील वेटरची वरकमाई अधिक असते. गोवा अथवा इतर पर्यटन स्थळावरील हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या वेटरचीही कमाई अधिक असते. अर्थात ही कमाई टीपवर अवलंबून असते. तसेच वेटरची अदब, त्याच्याकडून मिळणारी तत्पर सेवा यावर त्याची टीप अवलंबून असते. त्यामुळे याविषयीचा अंदाज बांधता येत नाही. वेटरची कमाई आलिशान हॉटेल, श्रीमंत गिऱ्हाईकं यावर अवलंबून असते. याविषयीचा अंदाज वर्तवणे त्यामुळे कठीण होते.

टीप पुलिंग काय?

मोठ्या हॉटेल्स, क्रूझ, पर्यटन स्थळावरील आलिशान हॉटेल्समध्ये श्रीमंत लोक येतात. डायनिंग टेबल, वाईन, व्हिस्की, रम सर्व्हर करणारे यांनाही टीप मिळते. श्रीमंत लोक बिलापेक्षा अधिक रक्कम देतात आणि टीप ठेवण्यास सांगतात. एका रात्री मोठा गल्ला जमा होतो. बिलाचे पैसे वजा केल्यानंतर उरलेली रक्कम मोठी असते. या मोठ्या रक्कमेतून कर्मचारी, वेटर पैसे वाटून घेतात. ही रक्कम रोजच्या पगाराच्या रक्कमेपेक्षा दुप्पट, तिप्पटही असू शकते. महिन्याला पगारापेक्षा तिप्पट कमाई होऊ शकते. कारण पर्यटक हे परदेशी असतात. त्यांच्या चलनात रक्कम अदा केल्यास वेटरचा मोठा फायदा होतो.

Follow Us
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड