GK Quiz: माणसाचे रोज किती केस गळतात? सांगा

SSC, Banking, Railway आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील

GK Quiz: माणसाचे रोज किती केस गळतात? सांगा
gk quiz
| Updated on: Jul 20, 2023 | 12:54 PM

मुंबई: आजच्या काळात कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सची खूप गरज असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. चला तर मग खाली दिलेले प्रश्न वाचा, उत्तर माहित आहे का याचा विचार करा. उत्तर येत असेल तर उत्तम, नसेल येत तर आम्ही खाली ते दिलेलंच आहे.

प्रश्न 1: आपण दररोज किती केस गमावतो?

– आपले दररोज सुमारे 200 केस गळतात.

प्रश्न 2: खारूताईचे वय किती असते हे तुम्हाला माहित आहे का?

– खारूताईचे वय सुमारे 2 वर्षे असतं.

प्रश्न 3: जगभरात इंटरनेटवरील 80% ट्रॅफिक कुठून येतं?

– जगभरातील इंटरनेटवरील 80% ट्रॅफिक सर्च इंजिनमधून येते.

प्रश्न 4 : पृथ्वीवर दर सेकंदाला किती वेळा वीज पडते?

– दर सेकंदाला सुमारे 100 वेळा पृथ्वीवर वीज पडते.

प्रश्न 5: आपल्या शरीरात किती लोह आहे?

– आपल्या शरीरात इतके लोह असते की त्यापासून सुमारे 1 इंच लांब खिळा बनवू शकतो.

प्रश्न 6: कोणत्या फळात साल आणि बिया दोन्ही नसतात?

मलबेरी म्हणजेच तुती. या फळात साल आणि बिया दोन्ही आढळत नाहीत.