कोण आहेत गितीका श्रीवास्तव?, ज्यांनी पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्तांची जबाबदारी घेतली

| Updated on: Aug 28, 2023 | 3:29 PM

इस्लामाबादमध्ये पहिल्या भारतीय महिला उच्चायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांपासून पाकिस्तानात पूर्णवेळ कोणतेही उच्चायुक्त नव्हते.

कोण आहेत गितीका श्रीवास्तव?, ज्यांनी पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्तांची जबाबदारी घेतली
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानातील उच्चायुक्तांची ( High Commissioner of Pakistan ) जबाबदारी महिला अधिकारी सांभाळणार आहेत. ही जबाबदारी आयएफएस अधिकारी गितीका श्रीवास्तव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गितीका यांनी त्यांच्या करिअरचा बराचसा कालावधी हा चीनमध्ये घालवला. यापूर्वी त्या इंडो पॅसिफीक डिव्हीजनमध्ये (Indo Pacific Division) तैनात होत्या. गितीका श्रीवास्तव (Gitika Srivastava ) यांना पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्त करण्याची जबाबदारी देण्यात आली. ही माहिती पाकिस्तानचे वर्तमानपत्र द न्यूजने दिली आहे. इस्लामाबादमध्ये पहिल्या  भारतीय महिला उच्चायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांपासून पाकिस्तानात पूर्णवेळ कोणतेही उच्चायुक्त नव्हते.

कोण आहेत गितीका श्रीवास्तव?

गितीका श्रीवास्तव या २००५ च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. त्या मूळच्या उत्तर प्रदेशाच्या राहणाऱ्या आहेत. करिअरचा त्यांचा बराच कालावधी हा चीनमध्ये गेला. तत्पूर्वी त्यांनी कोलकाता येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी विदेश मंत्रालयाचा आईओआर डिव्हीजनमध्ये काम केलंय. सध्या त्या विदेश मंत्रालयाच्या इंडियन पॅसिफीक डिव्हीजनमध्ये जॉईंड सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.

कुटनीतीमध्ये मोठा अनुभव

गितीका श्रीवास्तव यांचे बहुपक्षीय कुटनीतीकडे लक्ष असते. पाकिस्तानमध्ये तैनात इंडो पॅसिफीक डिव्हीजनमधील अनुभवाचा त्यांना फायदा होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्त नाहीत. इस्लामाबादमध्ये भारतीय शेवटचे उच्चायुक्त अजय बिसारिया होते. २०१९ मध्ये भारताने जम्मू काश्मीरमध्ये आर्टीकल ३७० लागू केला. तेव्हापासून पाकिस्तानने भारताशी राजनैतीक संबंध संपवले. तत्कालीन पंतप्रधान इमरान खान यांनी अजय बिसारिया यांना पाकिस्तान सोडण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम राजनैतिक संबंधावर झाला.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानातील माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, भारतात पाकिस्तानातील उच्चायुक्त म्हणून साद वाराईय यांना जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ते भारतात पाकिस्तानचे प्रभारी एजाज खान यांची जागा घेतील. सध्या ही जबाबदारी एजाज खान सांभाळत आहेत. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा महिला अधिकारी उच्चायुक्त या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दोन्ही देशातील संबंधात सुधारणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.