
जगभरात ट्रॅफीक सिग्नलचा लाईट तीन रंगाच्या असतात आणि त्याचा अर्थही एकच असतो. लाल रंगाचा सिग्नल लागला तर वाहने थांबवा, पिवळा रंगाचा सिग्नला लागला तर सावध व्हा तसेच हिरव्या रंगाचा सिग्नल म्हणजे ओके आता कार पुढे न्या. परंतू जगात एक देश आहे जेथे ट्रॅफीक सिग्नल हिरवा नसून नीळा आहे.त्यामुळे तुम्ही या देशात जाल तर ही माहिती तुम्हाला माहिती हवीच…
जपानमध्ये तुमचे सिग्नलकडे गेले तर तेथे ट्रॅफीकला सिग्नलला निळ्या रंगाचा देखील समावेश असतो. येथे ग्रीन ट्रॅफीकला निळा किंवा ब्ल्यू रंग म्हटले जाते. जपानमध्ये ग्रीन सिग्नलला निळा सिग्नल का म्हटले जाते हे पाहूयात…
रिडर डायजेस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या प्रश्नाचे उत्तर जपानी भाषेच्या इतिहासाशी जोडलेले आहे. भाषा तज्ज्ञांच्या मते प्राचीन जपानी भाषेत रंगांसाठी खूपच मर्यादित शब्द होते. तेव्हा केवळ चार रंगाचे नावे प्रचलित होती. लाल, काळा, पांढरा आणि निळा. या चार रंगातच उर्वरित सर्व रंगांना ओळखले आणि सांगितले जात होते.
यामुळे जपानी भाषेत अनेक वर्षे हिरव्या रंगासाठी ‘आओ’ म्हणजे निळ्या रंगाच्या श्रेणीत टाकले होते. त्यानंतर ‘मिदोरी’ शब्द समोर आला, ज्याचा वापर खास करुन हिरवाई आणि निसर्गासाठी केला जात असतो. वास्तविक भाषेत नवा शब्द जोडला गेला. निळ्या रंगाला ओळखण्यासाठी मिदोरी शब्द आला तरी जुन्या आओ शब्दाचे वापर काही संपला नाही.
जापानमध्ये साल १९३० च्या दशकात रस्त्यांवर वाहतूकीचे नियंत्रण करण्यासाठी टॅफीक सिग्नलही संकल्पाना सुरु आहे. सुरुवातीच्या काळात हिरव्या दिव्याला सामान्यपणे हिरवेच म्हटले जात होतो. परंतू १९६० मघ्ये लागू झालेल्या रोड ट्रॅफीक कायद्यात हिरव्या सिग्नलला अधिकृतपणे ‘आओ’ म्हणजे निळा रंग असा शब्द वापरला गेला. लोकांच्या व्यवहारात आधीच हा शब्द वापर होत होता. यामुले हे नवा सहजपणे स्विकारले गेले.
नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला की सिग्नलचा रंग हिरवा असायला हवा, त्यानंतर १९७३ मध्ये जपान सरकारने एक मधला मार्ग काढला. सिग्नलचा रंग निळ्यावरुन हिरवा करण्यात आला.परंतू ज्यास पाहून तो हिरवा वाटावा असा केला आणि जपानी भाषेत त्याला ‘आओ’ म्हटले जाऊ शकेल.
जपानी भाषेत अनेक अशा वस्तू हिरव्या असतानाही भाषेत त्यांना निळे म्हटले जाऊ शकते. उदाहरणार्थ हिरवे सफरचंद, कच्ची पपई, भाताची रोपांची कोवळी पाने यांच्यासाठी ‘आओ’ शब्दाचा वापर होतो.येथे ‘आओ’चा अर्थ केवळ रंग नाही तर नवा, कच्चा वा अनुभव नसलेला असा देखील आहे.
वास्तविक बहुतांशी ट्रॅफीक लाईट्स हिरव्याच असतात. परंतू त्यांचा रंग थोडासा निळसर असतो. डोळ्यांना पाहिल्यानंतर तो हिरवा वाटतो. परंतू भाषेत आजही निळा म्हटले जाते. जर तुम्ही जपान फिरायला गेला तर एक गोष्ट ध्यानात ठेवा की जेव्हा जपानी भाषेत कोणी ‘आओ’ म्हणाले तर समजा की सिग्नल हिरवा आहे किंवा पुढे जाण्यास परवानगी मिळाली आहे.