Kalyan Dombivli | केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया? राजकीय वर्तुळात…
महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन अडीच- अडीच वर्ष महापौर वाटून घेतात की शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे काही नगरसेवक फोडून आपला स्वतःचा महापौर बसवतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र ठाकरे बंधूंचे नगरसेवक हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेम चेंजर बनणार अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी महापौर कोणाचा बसेल यावर भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. ठाकरेंचे काही नगरसेवक हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय. तर मनसे देखील सेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन अडीच- अडीच वर्ष महापौर वाटून घेतात की शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे काही नगरसेवक फोडून आपला स्वतःचा महापौर बसवतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र ठाकरे बंधूंचे नगरसेवक हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेम चेंजर बनणार अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
यावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलंय. अशी कोणतीही चर्चा सुरु नाही, निवडून आलेले सगळे नगरसेवक, 11 उद्धव ठाकरेंचे आणि 5 मनसेचे मिळून 16 नगरसेवक हे पक्षाबरोबर एकत्र आहेत, आणि पक्ष नेतृत्व जी कोणती भूमिका घेईल त्या भूमिकेसोबत आमचे सगळे नगरसेवक राहणार आहेत, असंही या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

