AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी नवा पॅटर्न, महाविकास आघाडीत अखेर या पक्षाचा समावेश; मोठा गेम

याचा काही फार्म्युला ठरलेला नाही, ताकतीवर जागा अवलंबून आहेत, जागा संख्येवर नाहीत, तिथला कार्यकर्ता, तेथील संघटनात्मक, राजकीय शक्ती सगळं तपासून पाहू असेही दानवे यांनी म्हटले आहे.

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी नवा पॅटर्न, महाविकास आघाडीत अखेर या पक्षाचा समावेश;  मोठा गेम
महाविकास आघाडी पुन्हा चर्चेत
| Updated on: Jan 19, 2026 | 7:21 PM
Share

एकीकडे मुंबई महानगर पालिका आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत महापौर कोणाचा होणार यावरुन नाट्य रंगात आले असताना तेथे छत्रपती संभाजीनगरमध्येही वेगळी समीकरणे जुळून येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत.

यासाठी संयुक्त बैठकीत नऊ पैकी सात तालुक्यातील सात तालुक्यातील जागा वाटपात एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. बैठकीला ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, खासदार कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे तर वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांची उपस्थिती होती. जागा वाटपाची चर्चा आज पूर्ण होईल असे ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगरातील 63 जिल्हा परिषद आणि 126 पंचायत समिती आहेत त्यावर काँग्रेस शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरू आहे. ही चर्चा ही चर्चा अतिशय सकारात्मक होत आहे, या चर्चेतून योग्य मार्ग निघेल आणि सगळ्या जागा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ताकतीने लढण्याचा प्रयत्न करू असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

जागा वाटपाचे निश्चित सूत्र नाही

जागा वाटपाचे निश्चित सूत्र काही ठरलेले नाही. पक्षाची स्थानिक ताकद आणि कार्यकर्त्यांचा विचार पाहून सर्व निश्चित होणार असल्याचे अंबादास दानले यांनी म्हटले आहे. नऊ पैकी आमचं सहा – सात तालुक्यात आमचे एकमत झाल आहे असेही ते म्हणाले.  शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली का या प्रश्नावर विचारले असता दानवे म्हणाले की ते पण आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आमचं बोलणं झालं आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांना एकत्रितपणे आपण सामोरे गेले पाहिजे असं मत सगळ्यांचे आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं अशी भूमिका आम्ही ठेवतोय. व्यक्तिगत आमचा कोणाचा शत्रू नाही, मात्र या ( शिंदे शिवसेना आणि भाजपा ) राजकीय पक्षांच्या विरुद्ध लढले पाहिजे आणि आम्ही लढतोय.

 असे इथे काही होणार नाही

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरु आहे याबद्दल विचारले असता दानवे म्हणाले की मला असं वाटते तसं काही संभाजीनगरमध्ये तरी होणार नाही, पवार साहेबांची राष्ट्रवादी स्वतंत्र आहे, अजित दादांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे इथे काही होणार नाही असाही दावा त्यांनी केला. सहा तासापासून आम्ही इथे बसलो आहे आज रात्रीपर्यंत आम्ही फायनल करू आणि उद्या आणि परवाचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे असेही दानवे यांनी सांगितले.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.