कासव कोणता रंग दिसताच लगेच हल्ला करतात? काय आहे त्यामागचं कारण

कासव हे समुद्रात आणि पाण्याच्या जवळ राहणारा प्राणी आहे. पण तुम्हाला माहित आहे की, प्रत्येक प्राण्यात एक विशिष्ट समज असते. त्यांना जर कोणत्या गोष्टी पासून धोका असेल तर सगेचच ते प्रतिकार करण्याच्या मोडमध्ये येतात. असंच कासवाचं देखील आहे. पण हा कासव गडद रंगाच्या गोष्टींना का घाबरतो जाणून घ्या.

कासव कोणता रंग दिसताच लगेच हल्ला करतात? काय आहे त्यामागचं कारण
| Updated on: Nov 06, 2024 | 9:33 PM

कासव हे त्यांच्यात असलेल्या नैसर्गिक वर्तनात कोणतेही बदल करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत असताना तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की, त्यांना काळ्या किंवा इतर गडद रंगाच्या वस्तू दूर ठेवल्या पाहिजे. तलाव, नदी किंवा कोणत्याही जलाशयाच्या आजूबाजूला तुम्ही कासवे पाहिली असतील. पण तुम्हाला माहित आहे की, कासवांना काळ्या रंगाबद्दल एक वेगळीच वागणूक असते. ज्यामुळे ते आक्रमक होऊ शकतात. सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल की, कासवाला समोर काळ्या रंगाच्या वस्तू दिसल्या की तो लगेच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. काळे शूज असो किंवा इतर कोणत्याही काळ्या वस्तू दिसल्या की कासव त्यांच्यावर हल्ला करायला बघतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संशोधनात असे समोर आले आहे की, कासवांना हा काळ्या रंगाचा तिरस्कार नसतो. काळा रंग हे त्यांच्या भक्षकांशी जोडतात. पण काळा रंग हा त्यांच्यासाठी संभाव्य धोका दर्शवितो. ज्यामुळे ते सावध होतात. जेव्हा जेव्हा त्यांना काळ्या रंगाचे काही दिसते ते त्याच्याकडे शिकारी असल्यासारखे पाहतात. आपल्या शेलने ते त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा भाग असतो.

कासवांना केवळ काळाच नाही तर इतर रंग देखील ओळखता येतात. लाल, हिरवा, निळा, केशरी, पिवळा असे रंग ते ओळखण्याची क्षमता ठेवतात. काही कासव जे समुद्रात असतात किंवा स्लाइडर कासवे जे हिरव्या आणि निळ्या रंगांकडे अधिक आकर्षित होतात, कारण ते त्यांच्या सागरी वातावरणाच्या जवळ असतात. परंतु गडद रंग, विशेषत: काळा, ते बर्याचदा विरोध करतात.

जंगलात गडद रंग हे धोकादायक शिकारींचे प्रतीक मानले जातात. कासव त्यांच्या नैसर्गिक वातावरणात अशा रंगांना भक्षकांशी जोडतात. उदाहरणार्थ, कावळे आणि साप यांसारखे शिकारी प्राणी देखील गडद रंगाचे असतात. या कारणास्तव, कासव काळा रंग पाहून सावध होतात आणि आक्रमक प्रतिक्रिया देतात.

कासवांची दृष्टी पाण्यात आणि जमिनीवरील वातावरण ओळखण्यासाठी विकसित झाली आहे. जंगलात, त्यांची दृष्टी अशी आहे की ते प्रत्येक हालचाली आणि संभाव्य धोका ओळखू शकतात. त्यामुळे काळा रंग हा ते शिकारी म्हणून पाहतो आणि जवळ आल्यास ते हल्ला करण्याचा प्रयत्न करतात.