AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याकडे दोन वोटर आयडी आहेत का? पकडल्यावर काय होऊ शकतं? जाणून घ्या नियम आणि सर्व काही

भारतात गेल्या काही दिवसात मतदार आणि मतदार याद्यांवरून बराच गदारोळ सुरु आहे. त्यात बनावट मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेकांकडे दोन मतदान कार्ड असल्याचं विरोधी पक्षाने दाखवून दिलं आहे. असं असताना जर तुमच्या दोन वोटर कार्ड असतील तर काय?

तुमच्याकडे दोन वोटर आयडी आहेत का? पकडल्यावर काय होऊ शकतं? जाणून घ्या नियम आणि सर्व काही
तुमच्याकडे दोन वोटर आयडी आहेत का? पकडल्यावर काय होऊ शकतं? जाणून घ्या नियम आणि सर्व काहीImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 10, 2025 | 6:45 PM
Share

निवडणुका, मतदान आणि मतदार याद्या वरून गेल्या काही दिवसांपासून रणकंदन माजलं आहे. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. इतकंच काय तर निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत तर दोन वोटर आयडीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे दोन वोटर आयडी सापडले आहेत. त्यावरून निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. दरम्यान दोन वोटर आयडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारतात दोन वोटर आयडी कार्ड ठेवणाऱ्यांची संख्या सांगणं तसं कठीण आहे. पण निवडणूक आयोग, एडीआर आणि मिडिया रिपोर्टनुसार ही संख्या लाखाच्या घरात असू शकते. निवडणूक आयोगाने सांगितलं की, 1.2 कोटी लोकांची नाव डुप्लिकेट, मृत किंवा चुकीच्या पत्त्यावर आढळली आहे. यापैकी काही जणांकडे दोन वोटर आयडी कार्ड होते.

दोन वोटर आयडीबाबत काय आहे नियम

  • भारतात दोन वोटर कार्ड ठेवणं हा गुन्हा आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार कोणतीही व्यक्ती एकाहून अधिक मतदारसंघात मतदान करू शकत नाही.
  • लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1950 च्या कलम 17 नुसार, कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मतदार यादीत समाविष्ट करता येत नाही.
  • कायद्याच्या कलम 18 नुसार एकाच मतदारसंघात एकाच व्यक्तीची नोंदणी फक्त एकदाच करता येते.
  • एखाद्या व्यक्तीने खोटी घोषणा करून किंवा फसवणूक करून मतदार यादीत आपले नाव दोनदा नोंदवले असेल. त्याच्याकडे दोन EPIC कार्ड असतील तर ते कायद्याच्या कलम 31 चे उल्लंघन आहे.
  • हा एक अदखलपात्र गुन्हा आहे. पोलीस दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय एफआयआर नोंदवू शकत नाहीत, म्हणून हा दंडनीय गुन्हा आहे.
  • तुम्ही दोन्ही मतदार कार्ड किंवा दोन्ही ओळखपत्रे ओळखपत्र म्हणून वापरली असतील तर ती निवडणूक फसवणूक आहे.
  • निवडणूक आयोग नोटीस पाठवू शकतो. तुमच्याविरुद्ध एफआयआर दाखल होऊ शकतो. तुमच्यावर खटला भरला जाऊ शकतो. तुमचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते.
  • तुम्हाला शिक्षा म्हणून एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं.

तुमच्याकडे दोन वोटर आयडी असतील तर काय कराल?

तुमच्याकडे दोन वोटर आयडी असतील तर फॉर्म 7 भरून एक कार्ड जमा करा. स्थानिक बूथ लेव्हल अधिकारी किंवा बीएलओशी संपर्क साधून दुरुस्त करून घ्या. असं करण्यासाठी कोणतीही कारवाई केली जात नाही. डुप्लिकेट किंवा जुने मतदार कार्ड रद्द करा. जुन्या कार्डसंदर्भात तपशील निवडणूक कार्यालयात जमा करा. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र रद्द करू शकता.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा