Height Problems : वय वाढलंय पण उंची वाढतंच नाही? ‘हे’ सोपे उपाय अन् झपाट्याने वाढेल उंची

उंचीचा प्रॉब्लेम हा बऱ्याच लोकांना असतो. वय तर वाढतं पण उंची वाढण्याचं काही नाव घेतं नाही. अशा वेळी आपण बाजारात उपलब्ध असणारी बरीच पेय पितो. पण त्याचाही काही परिणाम दिसत नाही. अशा वेळी खालील प्रमाणे उपाय केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

| Updated on: Nov 21, 2026 | 9:35 PM
1 / 7
 वय वाढत जातं पण काही जणांची उंची काही वाढतचं नाही. उंची वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण काही फायद होत नाही. उंची वाढण्याची ड्रिंक्स प्यायल्याने उंची वाढते कि नाही माहित नाही. पण खालील प्रकारे योग्य आहार आणि काही गोष्टी केल्याने तुमची उंची नक्की वाढू शकते.

वय वाढत जातं पण काही जणांची उंची काही वाढतचं नाही. उंची वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण काही फायद होत नाही. उंची वाढण्याची ड्रिंक्स प्यायल्याने उंची वाढते कि नाही माहित नाही. पण खालील प्रकारे योग्य आहार आणि काही गोष्टी केल्याने तुमची उंची नक्की वाढू शकते.

2 / 7

प्रोटीनयुक्त आहार : डाळी, कडधान्य, अंडी, दूध, दही, पनीर, सोयबीन यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी प्रोटिनं महत्त्वाचं असतं.

3 / 7

कॅल्शियमकडे खास लक्ष : दूध, दही, पनीर, तीळ आणि हिरव्या पालेभाज्यांमधून कॅल्शियम मिळू शकते. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम महत्त्वाचं असतं. त्यामुळे कॅल्शियमकडे दुर्लक्ष करू नका.

4 / 7

रोज व्यायाम करा : धावणं, सायकलिंग, पोहणं,खेळणे किंवा इतर व्यायाम नियमित करा. शरीर सक्रिय ठेवल्याने फिटनेस आणि मसल्सची वाढ होण्यास मदत होते.

5 / 7

योगा आणि स्ट्रेचिंग : योग केल्यानेही उंची वाढवता येते. रोज ताडासन, भुजंगासन,कॅट वॉक यांसारखे व्यायाम केल्याने लवचिकता वाढते. त्यामुळे उंची वाढवण्यास मदत होते.

6 / 7

सायकलिंग आणि ट्रेकिंग केलेच पाहिजे : शरीराच्या वाढीसाठी सायकलिंग महत्त्वाची मानली जाते. सायकलिंग केल्याने शरीर ताणले जाते. ट्रेकिंग केल्याने शरीराची हालचाल मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

7 / 7

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us