रेल्वेचा नियम ठरतो फायदेशीर, महिलेसोबत कुटुंबातील एका व्यक्तीला असा करता येतो स्वस्तात फर्स्‍ट एसी प्रवास

| Updated on: Apr 16, 2024 | 1:03 PM

ट्रेनमधील फर्स्ट क्लासचा प्रवास सर्वात महाग असतो. पण फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्याचा आनंद काही औरच असतो. रेल्वेच्या एका नियमामुळे स्वस्त तिकिटात आणखी एक प्रवासी महिलेसोबत फर्स्ट एसीचा आनंद घेऊ शकतो. रेल्वेचा हा नियम जाणून घ्या.

रेल्वेचा नियम ठरतो फायदेशीर, महिलेसोबत कुटुंबातील  एका व्यक्तीला असा करता येतो स्वस्तात फर्स्‍ट एसी प्रवास
Follow us on

उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात, लांब पल्ल्यांच्या ट्रेनमधून प्रवास करायचा म्हणजे टेन्शनच, त्यात सोबत फॅमिली असेल तर मग अजूनच कठीण होऊ शकतं. ट्रेनमधील फर्स्ट क्लासचा प्रवास सर्वात महाग आहे. पण फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्याचा आनंद काही औरच असतो. पण फर्स्ट एसीमध्ये दोनच जण प्रवास करू शकतात. पण त्याचं तिकीट जास्त महाग असल्याने अनेक प्रवासी मन मारून इत क्लासमधून प्रवास करतात. पण रेल्वेच्या एक नियमामुळे स्वस्त तिकिटात आणखी एक प्रवासी हा महिलेसोबत फर्स्ट एसीचा आनंद घेऊ शकतो. रेल्वेचा हा नियम कोणता ते जाणून घेऊया.

पुढच्या वेळी तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल, तुमच्याकडे इतर कोणत्याही क्लासचे कन्फर्म तिकीट नसेल म्हणून तुमची पत्नी आणि मुलीचं तिकीट फर्स्ट एसीमध्ये बुक केलं असेल आणि मुलासह तुमचं तिकीट सेकंड एसीमध्ये बुक केल असेल तर निराश होऊ नका. अशा वेळी मुलगा हा त्याच्या आईसोबत रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत प्रवास करू शकतो. परंतु मुलाचे वय 12 वर्षांपेक्षा कमी असावे. TTE देखील हे नाकारू शकत नाही. अशा प्रकारे फर्स्ट एसीने स्वस्त भाड्यात प्रवास करता येतो. त्याचप्रमाणे, 12 वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल फर्स्ट एसी कूपमध्ये आईसोबत प्रवास करू शकते. पण त्यावेळी कूपमध्ये दोन्ही महिलाच असाव्यात, अशी अट आहे.

लेडीच कोचचा हा नियम माहीत आहे का ?

एखादा पुरूष हा कोणत्याही परिस्थितीत लेडीज कोचमधून किंवा महिलांच्या डब्यातून प्रवास करू शकत नाहीत. पण या डब्यातून ‘मुलगा’ नक्कीच प्रवास करू शकतो, असा नियम आहे. उदाहरणार्थ, जर एखादी महिला लेडीज कोचमध्ये प्रवास करत असेल आणि तिचा मुलगा दुसऱ्या कोचमध्ये प्रवास करत असेल, तर रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत त्याच्या आईसोबत लेडीज कोचमध्ये प्रवास करू शकतो. पण त्या मुलाचे वय 12 वर्षांपेक्षा कमी असेल तरच तो असा प्रवास करू शकतो, अशी अट आहे. रेल्वे नियमावलीनुसार, रात्रीच्या वेळी लहान मूल महिला कोच किंवा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करू शकते.